लोकसत्ता टीम

यवतमाळ : उसनवारी पैशांच्या वादात महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री मृत्यू झाला. ही घटना शहरातील आठवडी बाजार, तारपुरा येथे घडली.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
case registered against person who stole jewellery of dead woman in kurla bus accident case
कुर्ला बस अपघात: मृत महिलेचे दागिने चोरणाऱ्याविरोधात अखेर गुन्हा दाखल
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…

सदाफ शेख शेख अकील (३०, रा. तारपुरा), असे मृत महिलेचे नाव आहे. बेबी आनंद जोशी (५०), विशाल आनंद जोशी (२४, रा. तारपुरा, आठवडी बाजार), अशी अटक करण्यात आलेल्या मारेकर्‍यांची नावे आहेत.

आणखी वाचा-खगोलप्रेमींसाठी २०२४ मध्ये पर्वणी! वर्षाच्या प्रारंभीच पृथ्वी व सूर्याचे अंतर कमी होणार; वाचा वैशिष्ट्ये

या महिलेवर आरोपींनी चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले होते. या प्राणघातक हल्ल्यानंतर महिलेचा पती शेख अकील शेख जमाल याने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. शेख अकील याचा कुरकुरे, नरडे आणि पापड विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायासाठी शेजारी घरासमोर राहणार्‍या बेबी जोशीकडून ३० हजार रुपये उसनवारीने घेतले होते. त्यापैकी काही रक्कम परत केली होती. मात्र, त्यानंतरही ती पैसे मागत होती. शुक्रवारी बेबी हिने तिच्या मुलासह घरी येऊन शेख अकीलची आई जैतुनबीला पैशाच्या कारणातून कानशिलात मारली. त्याचा जाब विचारण्यासाठी शेख अकील हा पत्नी व वहिणीसह महिलेच्या घरी गेला. यावेळी महिलेच्या मुलाने पैसे का देत नाही, असे म्हणून सदाफ शेख हिच्या पोटात चाकूने वार केला. तसेच अकीलच्या वहिणीला मारहाण केली.

आणखी वाचा-जेष्ठांवरील अत्याचारांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी; मध्य प्रदेशात सर्वाधिक गुन्हे

प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर शनिवारी तिचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहरात दररोज खुनाचे सत्र सुरू असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

Story img Loader