लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यवतमाळ : उसनवारी पैशांच्या वादात महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री मृत्यू झाला. ही घटना शहरातील आठवडी बाजार, तारपुरा येथे घडली.
सदाफ शेख शेख अकील (३०, रा. तारपुरा), असे मृत महिलेचे नाव आहे. बेबी आनंद जोशी (५०), विशाल आनंद जोशी (२४, रा. तारपुरा, आठवडी बाजार), अशी अटक करण्यात आलेल्या मारेकर्यांची नावे आहेत.
या महिलेवर आरोपींनी चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले होते. या प्राणघातक हल्ल्यानंतर महिलेचा पती शेख अकील शेख जमाल याने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. शेख अकील याचा कुरकुरे, नरडे आणि पापड विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायासाठी शेजारी घरासमोर राहणार्या बेबी जोशीकडून ३० हजार रुपये उसनवारीने घेतले होते. त्यापैकी काही रक्कम परत केली होती. मात्र, त्यानंतरही ती पैसे मागत होती. शुक्रवारी बेबी हिने तिच्या मुलासह घरी येऊन शेख अकीलची आई जैतुनबीला पैशाच्या कारणातून कानशिलात मारली. त्याचा जाब विचारण्यासाठी शेख अकील हा पत्नी व वहिणीसह महिलेच्या घरी गेला. यावेळी महिलेच्या मुलाने पैसे का देत नाही, असे म्हणून सदाफ शेख हिच्या पोटात चाकूने वार केला. तसेच अकीलच्या वहिणीला मारहाण केली.
आणखी वाचा-जेष्ठांवरील अत्याचारांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी; मध्य प्रदेशात सर्वाधिक गुन्हे
प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर शनिवारी तिचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहरात दररोज खुनाचे सत्र सुरू असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.