नागपूर : महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघात शिवसेना (ठाकरे गट)ला जागा सोडण्याची सहमती झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश इटकीलवार यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरला. यामुळे महाविकास विकास आघाडीत उमेदवारीवरून एकवाक्यता नसल्याचे दिसून येते.
काँग्रेसने नागपूर शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेना (ठाकरे गट) यांच्यासाठी सोडली आहे. त्यामुळे येथे शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर आता राष्ट्रवादीने इटकीलवार यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. यापूर्वी आघाडीला समर्थन असलेले शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
हेही वाचा <<< अमरावती : काँग्रेसमध्ये बंड; लिंगाडेंच्या उमेदवारीनंतर प्रजापतींचा राजीनामा
शिक्षक भारतीने काँग्रेसला पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मदत केल्याचा दावा केला आहे. काँग्रेसने झाडे यांना सर्मथन द्यावे, यासाठी माजी मंत्री सुनील केदार, आमदार अभिजीत वंजारी, बबराव तायवाडे आणि अतुल लोंढे यांनी नाना पटोले यांची आज त्यांच्या नागपूर निवासस्थानी भेट घेतली होती. तर चंद्रपूर येथील अपक्ष उमेदवार सुधाकर अडबाले यांनाही अर्ज दाखल केला आहे. अपेक्षा आहेत. अशाप्रकारे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिक्षक भारती आणि शिवसेना असे चार उमेदवार महाविकास आघाडीचे झाले आहेत.