देवेश गोंडाणे
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा, निकाल, मुलाखतींच्या संथगतीबद्दल सध्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. मागील तीन वर्षांतील ‘एमपीएससी’च्या पाच महत्त्वाच्या परीक्षांचे निकाल प्रलंबित आहेत. बारा विभागांमधील विविध पदांच्या परीक्षा रखडलेल्या असून तीन विभागांच्या मुलाखती बाकी आहेत. पाच परीक्षांचा अभ्यासक्रम प्रलंबित आहे. काही परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्यात मात्र, पुढे काहीच झालेले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
करोनानंतर ‘एमपीएससी’ परीक्षा आणि निकालाची घडी काहीशी रुळावर आली होती. परंतु, मागील वर्षभरापासून ही घडी विस्कटली आहे. निवडणुकीचे कारण देत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आली. दोन वर्षांपासून उमेदवार या परीक्षेची वाट बघत होते. २८ एप्रिल रोजी होणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’, तसेच १९ मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट ब’, ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब’ या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. अनेक परीक्षांचे अभ्यासक्रम दीड वर्षांपासून जाहीर झाले नाहीत. तर औषध निरीक्षक, वन सेवा गट-अ, सहाय्यक आयुक्त भरती आदी परीक्षा रखडलेल्या आहेत.
पूर्व परीक्षा निकाल कधी?
’ एमपीएससी न्यायिक सेवा ‘जेएमएफसी’ परीक्षा-२०२३; पूर्व परीक्षा ९ सप्टेंबरला झाली निकाल नाही; मुख्य परीक्षेची तारीख अद्याप जाहीर नाही; एमपीएससी सहाय्यक आयुक्त – बीएमसी; दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंड अधिकारी गट अ २०२२ – (पूर्व परीक्षा); खात्यांर्गत पीएसआय २०२३ पूर्व परीक्षा; दंत शल्यचिकित्सक (गट- ब)
हेही वाचा >>>चीनने मोठ्या प्रमाणात ‘निवडणूक रोखे’ खरेदी केले… प्रकाश आंबेडकरांच्या आरोपाने खळबळ
रखडलेल्या मुलाखती :
’ प्रशासकीय अधिकारी सामान्य राज्यसेवा गट – ब; एमपीएससी (सहाय्यक प्राध्यापक भरती २०२३); तालुका क्रीडा अधिकारी
परीक्षा बाकी :
’ औषध निरीक्षक – (अडीच वर्षांपासून); महाराष्ट्र वन सेवा गट- अ (५ महिन्यांपासून); सहाय्यक आयुक्त भरती (एक वर्षांपासून); सहायक नगर रचनाकार श्रेणी-१ (दीड वर्षांपासून); कनिष्ठ भूवैज्ञानिक आणि सहायक भूवैज्ञानिक (१५ महिन्यांपासून); सहायक संचालक गट- अ;
अधीक्षक, सामान्य राज्यसेवा गट- ब (१४ महिन्यांपासून); वरिष्ठ संशोधन अधिकारी (जाहिरात क्रमांक १५/ २०२०); प्रशासकीय अधिकारी (२४ /२०२२); सहायक प्रशासकीय अधिकारी (५५/ २०२२); प्रशासकीय अधिकारी (७९/ २०२२); प्रशासकीय अधिकारी (१०५/ २०२१)
या परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध
भूवैज्ञानिक गट अ खनिकर्म (जाहिरात दिनांक २१/०९/२०२२, १११/२०२२, ११२/२०२२) आणि पाणीपुरवठा विभागाअंतर्गत असलेले भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाची कनिष्ठ भूवैज्ञानिक गट-ब, सहाय्यक भूवैज्ञानिक गट- ब अनुक्रमे १९ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध झाली. तसेच १३४/२०२३ सहाय्यक भूभौतिकतज्ज्ञ ५ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध होऊन या परीक्षांबाबत एमपीएससीने अद्यापी कोणतीही माहिती दिलेली नाही.
अभ्यासक्रमच नाही
अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्यसेवा गट-ब (प्रशासक), (जाहिरात क्रमांक ९०/ २०२२) – गेल्या १५ महिन्यांपासून कोणतीही माहिती दिलेली नाही; कनिष्ठ भूवैज्ञानिक गट-ब, सहाय्यक भूवैज्ञानिक गट- ब; सहायक संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय (१ वर्षांपासून ); अधिव्याख्याता गट- ब (जाहिरात क्रमांक ११५/ २०२३)
सध्या ‘एमपीएससी’ची एकही परीक्षा नियोजित वेळेत होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी नैराश्यात जात आहेत. मराठा आरक्षण किंवा अन्य कारणांनी रखडलेल्या परीक्षा, शारीरिक चाचणी पावसाळय़ापूर्वी आयोगाने घ्यावी. – उमेश कोर्राम, स्टुडंट राईट्स असो. ऑफ इंडिया.
विविध परीक्षांचे निकाल जाहीर होत आहेत. आरक्षणाच्या तरतुदींसाठी काही परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. त्यांच्याही तारखा लवकरच जाहीर होतील. शिवाय पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीच्या उमेदवारांचे नुकसान होणार नाही याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. – डॉ. सुवर्णा खरात, सचिव, एमपीएससी.