नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  १३४ वी आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील संविधान चौक आणि दीक्षाभूमीवर अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली. तसेच काही ठिकाणी फटाक्यांची आतेषबाजी, मिरवणुकांचेही आयोजन करत भीम जन्मोत्सवाचा जल्लोष केला आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज  जयंती असून नागपुरात मध्यरात्रीपासूनच मोठ्या उत्साहात अनुयायी महामानवाला वंदन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले. 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरच्या संविधान चौकावर दरवर्षी प्रमाणे यंदाही मध्यरात्री मोठी गर्दी उसळल्याचे बघायला मिळाले. मध्य रात्री केक कापून आणि आतषबाजी करून जन्मोत्सावाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर  सकाळी दीक्षाभूमी आणि संविधान चौकात बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि विविध सामाजिक संघटनांनी संविधान चौकातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. समता सैनिक दलातर्फे संविधान चौकात संविधानाच्या प्रतिचे निशुल्क वितरण करण्यात आले.

 शहरातील अनेक भागातून रॅली आणि मिरवणूक काढत भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यावेळी फटाक्यांची ही अतिषबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भीम अनुयायी रस्त्यावर उतरून जल्लोष करताना दिसून आले आहे.

डॉ. बाबासाहेबांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. १८९१साली या दिवशी बाबासाहेबांचा जन्म झाला. आंबेडकर जयंती समता दिवस म्हणूनही ओळखली जाते, कारण बाबासाहेबांनी आयुष्यभर समानतेसाठी लढा दिला तसेच कायद्याच्या दृष्टीने सर्व भारतीय नागरिकांना न्याय देण्यावर भर दिला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरच्या संविधान चौकावर दरवर्षी प्रमाणे यंदाही मध्यरात्री मोठी गर्दी उसळल्याचे बघायला मिळाले.

समता सैनिक दलातर्फे संविधान चौकात संविधानाच्या प्रतिचे निशुल्क वितरण करण्यात आले. येथे काही संस्थांनी बूक स्टॉल लावले होते. तर काहींनी सांस्कृतिक कार्यक्रम, बौद्ध आणि भीम गीताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. काही संघटनांनी शरबत आणि ज्यूस वितरण केले. विविध बँकांचे माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले. काही संघटनांनी कडून आरोग्य तपासणी देखील करण्यात येत होती.

बिहारच्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्ध बांधवांच्या स्वाधीन करण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहाराचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना हजारो पोस्ट कार्ड पाठवण्यात येत आहेत. या पोस्ट कार्डवर येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.