वर्धा : दिवाळी पर्व आनंदाचे तसेच मिठाईवर ताव मारण्याचे पण पर्व ठरते. मात्र सर्वांनाच याचा लाभ घेणे शक्य होईल, असे नाही. ही सामाजिक उणीव भरून काढण्याचे काम सचिन अग्निहोत्री प्रतिष्ठानतर्फे दिवाळीस केल्या जाते. यावर्षीच्या उपक्रमात तर लाभ घेण्यासाठी झुंबड उडाली होती.
हेही वाचा – यवतमाळात कुंटणखान्यावर छापा, महिलेसह तरुण ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
प्रेरक पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री म्हणाले की, संस्था परिवार शैक्षणिक कार्य पार पाडतानाच सामाजिक दायित्व जोपासण्याचे भान ठेवते. म्हणून समाजातील शेवटचा घटक दिवाळीस विन्मुख राहू नये म्हणून हा उपक्रम आयोजित केल्या जातो. तो झाल्यावरच आम्ही तसेच शिक्षक, कर्मचारी आमची दिवाळी साजरी करतो. गुरुवारी सायंकाळी सुरू झालेले वाटप रात्री अकरापर्यंत चालले. गरजूंनी शिस्तीत या उपक्रमाचा लाभ घेतल्याचे दिसून आले. तसेच शहरातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.