चंद्रपूर येथील समाज कल्याण विभाग कार्यालयात महाज्योती अंतर्गत ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप सुरू आहे. एक दिवस अगोदर ५०० पेक्षा अधिक विद्यार्थांना टॅब वाटपची माहिती देण्यात आली. त्यात कार्यालयात एकाच टेबल वरून वाटप सुरू असल्याने गोंधळ उडाला आहे.समाज कल्याण विभागाच्या वतीने महाज्योती अंतर्गत वर्ष २१-२२ व २२ – २३ या दोन वर्षाचे टॅब वाटप सुरू आहे. या टॅब वाटपासाठी एकच टेबल असल्याने गोंधळ उडाला आहे. जवळपास पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थांना टॅब वाटप सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>बुलढाणा: ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धिविनायक बोन्द्रे यांचे निधन; चिखलीतील ‘अनुराधा परिवार’चे शिल्पकार

काल गुरुवारी रात्री सर्व विद्यार्थ्यांना टॅब वाटप होणार आहे याचे संदेश गेल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयात टॅब साठी गर्दी केली आहे. टॅब घेण्यासाठी सकाळपासून जेवणाविना विद्यार्थी ताटकळत होते त्यामुळे समाज कल्याण कार्यालयात गोंधळ उडाला. अजूनही विद्यार्थांनची राग समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात आहे. समाज कल्याण अधिकारी यावलीकर यांनी अपुरे मनुष्यबळ असल्याने वाटपाचा एकाच टेबल असल्याचे सांगितले वर्ग अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना एमएचसीइटी, नीट चे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी टॅब वाटप सुरू आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distribution of tab under mahajyoti started in social welfare department office rsj 74 amy