बुलढाणा : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी उध्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणांनी जय्यत तयारी केली आहे. आज मंगळवारी मतदान साहित्यासह  हजारो मतदान अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी निर्धारित मतदान केंद्राकडे रवाना झाले आहे.

जिल्ह्यातील बुलढाणा ,चिखली, मलकापूर, मेहकर, जळगाव जामोद, खामगाव, सिंदखेडराजा मतदारसंघात मिळून ११५ उमेदवार रिंगणात उभे आहे.यात सहा प्रमूख पक्ष, वंचित बहुजन आघाडी, बसप, नवीन पक्ष आणि मोठ्या संख्येतील अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांचे भाग्य उद्या होणाऱ्या मतदानानंतर मशीन बंद होणार आहे. एकूण २२८८ मतदान केंद्रावरून सकाळी ७ ते संध्याकाळी६ वाजेदरम्यान मतदान पार पडणार आहे. 

maharashtra assembly election 2024 Injured anil deshmukh discharge from hospital after treatment
Anil Deshmukh Attacked : दगड मारा किंवा गोळ्या घाला, मी मरणार नाही… रुग्णालयातून बाहेर पडताच अनिल देशमुखांचा….
vba candidate affidavit mention support congress candidate in umarkhed assembly
Umarkhed Assembly Constituency :उमरखेडच्या निवडणुकीत ‘ट्विस्ट’ वंचित व…
Central Nagpur, Mominpura, Halba, Muslim,
‘हिंदी चिनी भाई-भाई’च्या धर्तीवर ‘हलबा- मुस्लिम भाई-भाई’चे नारे, मध्य नागपुरात…
मोहन अटाळकर maharashtra assembly election 2024 anil deshmukh attack was stunt for sympathy
अनिल देशमुखांचा सहानुभूतीसाठी स्टंट; चित्रा वाघ म्‍हणतात, ‘पुराव्‍यानिशी पर्दाफाश करू…’
16 lakh voters and 111 candidates in constituency in akola district assembly
१६ लाखांवर मतदारांच्या हातात  १११ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला…..आज  अकोला जिल्ह्यात….
Nana Patole allegation on BJP Vinod Tawde money distribution case
Vinod Tawade News: हा तर भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशातून मते विकत घेण्याचा प्रकार, तावडे प्रकरणावर पटोलेंचा आरोप
Indian Army soilder ganga jmuna , ganga jmuna,
वारांगणांच्या वस्तीत आले लष्करातील जवान… सौदा ठरवून आत जाताच….
Praveen Kunte alleges that BJP leader is behind Anil Deshmukh attack
Anil Deshmukh Attack: अनिल देशमुखांच्या हल्यामागे ‘या’ भाजप नेत्याचा हात… प्रवीण कुंटे पाटीलांनी थेट नावच घेतले..
BJP leader claims that Congress candidate attacked anil Deshmukh
Anil Deshmukh Attack: काँग्रेसच्या उमेदवाराने देशमुखांवर हल्ला केला, भाजप नेत्याचा अजब दावा

यासाठी कमीअधिक ११ हजार अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले. याशिवाय तीन हजार पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. सिंदखेडराजा मध्ये सर्वाधिक ३४९ मतदान केंद्र आहे. मलकापूर  मतदारसंघात ३०४, बुलढाणा  मतदारसंघात  ३३१ चिखली मतदारसंघात ३१२ ,मेहकर मतदारसंघात ३२६ सिंदखेडराजा मतदारसंघात ३४९, खामगाव मतदारसंघात३१८ तर जळगाव जामोद मतदारसंघात  ३१५ मतदान केंद्र आहे. 

हेही वाचा >>> Anil Deshmukh Attacked : दगड मारा किंवा गोळ्या घाला, मी मरणार नाही… रुग्णालयातून बाहेर पडताच अनिल देशमुखांचा….

यातील ४७९ मतदान केंद्र शहरी भागात  तर १८०९ मतदान केंद्र ग्रामीण भागात  आहेत.  जिल्ह्यातील एकूण २१ लाख ३४ हजार ५२० मतदार आहे. यामध्ये ११लाख ०९ हजार ७९१ पुरुष १० लाख २४हजार ६७१महिला मतदारांचा समावेश आहे.

आज १९ नोव्हेंबर रोजी दुपारी मतदान यंत्र, साहित्य घेऊन अधिकारी कर्मचारी आणि पोलीस नेमून देण्यात आलेल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले आहे. त्यापूर्वी त्यांना मतदान प्रक्रियेबध्दल संबधित उपविभागीय अधिकारी (महसूल) , आणि तहसीलदार यांनी मार्गदर्शन करून उपयुक्त सूचना आणि निर्देश दिले.

२६८ एसटी बस दिमतीला

दरम्यान उध्या होणाऱ्या मतदानासाठी विविध विभागाची वाहने, खाजगी वाहने , शैक्षणिक संस्थांची वाहने आणि एसटी बस यांचा वापर करण्यात येत आहे. भरारी पथक,  मतदान कर्मचारी, मतदान साहित्य यांची ने आन करण्यासाठी ही वाहने वापरण्यात येणार आहे  राज्य परिवहन मंडळाच्या २६८ बस कर्मचारी  आणि साहित्य वाहतूक साठी वापरण्यात येत आहे.

मतदानासाठी १२ ओळखपत्र ग्राह्य

ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे अशा मतदारांचे मतदार कार्डव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. या १२ प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखवून मतदारांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. किरण पाटील यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. ज्या मतदारांकडे मतदार ओळखपत्र नाही, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.या १२ प्रकारच्या पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र  पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.

मतदानासाठी सुट्टी

नागरिकांना हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी  सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्व मतदारसंघातील कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, असे आदेश जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे.