लोकसत्ता टीम

चंद्रपूर : चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक आणि शिपाईपदाच्या ऑनलाइन परीक्षेत पहिल्याची दिवशी बिघाड झाल्याने केंद्र बदलण्यात आले. यामुळे परीक्षार्थ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला, असा आरोप परभणीचे दत्ता पौळ यांनी केला. या परीक्षेत प्रचंड अनियमितता झाल्यामुळे ही नोकरभरती रद्द करून नव्या कंपनीकडून राबवावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकरभरती परीक्षा प्रक्रिया राबवणारी कंपनी बोगस आहे. परीक्षेत विचारलेले प्रश्न चुकीचे होते. आक्षेप घेतल्यानंतरही काहीच कार्यवाही झाली नाही. यासंदर्भात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी कंपनीकडे विचारणा केली. परंतु आयटीआय कंपनीने गुण वाढवून दिले नाही. २१ डिसेंबरला संगणकात घोळ झाला. अनेक प्रश्न चुकीचे होती. २२ डिसेंबरला जालना केंद्रावरील परीक्षा रद्द करण्यात आली. तिसऱ्या दिवशी, २३ डिसेंबरला औरंगाबाद येथे परीक्षा घेण्यात आली. त्याची पूर्वसूचना पूर्वसंध्येला देण्यात आली. २९ डिसेंबरला जालना केंद्र असताना नांदेड येथे परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे परीक्षार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. ९ ते ५ जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदवायचे होते. मात्र, उत्तरपत्रिकेत बदल केले नाही. १२ तासांच्या आता निकाल लावला आणि मुलाखती सुरू केल्या, असे पौळ यांनी सांगितले.

आणखी वाचा-तुरीचे दर घसरणीला, तरीही शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ

पौळ यांना लिपिक पदाच्या परीक्षेत ६५ गुण मिळाले. त्यांच्या मित्राला ५७ गुण आहे. मात्र त्यांना मुलाखतीला बोलावण्यात आले नाही. आयटीआय कंपनीचे हेल्पलाईन क्रमांक आणि ई-मेल बंद आहेत. उत्तर बरोबर असतानाही गुण देण्यात आले नाही. यासंदर्भात आयटीआय कंपनीकडे विचारणा केली. मात्र, २४ तासांनंतरही त्यात बदल करण्यात आला नाही, असा आरोप पौळ यांनी पत्रपरिषदेत केला.

उपोषण सुरूच, आज मोर्चा

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीविरोधात आरक्षण बचाव संघर्ष समितीचे मनोज पोतराजे आणि रमेश काळबांडे यांचे उपोषण सुरूच आहे. गेल्या सात दिवसांपासून उपोषणावर असल्यामुळे पोतराजे यांची प्रकृती खालावली आहे. नोकरभरतीविरोधात गुरुवारी मोर्चा काढण्यात येणार आहे.

Story img Loader