गोंदिया : जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम पंचायतय कोदामेडीअंतर्गत गट ग्रामपंचायत केसलवाडा येथील पटाच्या दानीवर ५ व ६ मार्च रोजी शंकरपटाचे आयोजन सडक अर्जुनी पट समितीच्या वतीने करण्यात आले होते. या पटात सट्टा शौकिनांनी राडा केल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पटात बैलगाडा शर्यतीत तब्बल ७ लाखांचे बक्षीस समितीच्या वतीने ठेवण्यात आले होते. त्यामुळे जवळील परिसरासह विविध जिल्ह्यांतून आणि शेजारील मध्यप्रदेश, छत्तीसगढ या परराज्यांतून शेतकरी आपली बैलजोडी घेऊन लाखोंचे बक्षीस जिंकण्यासाठी या ठिकाणी आले होते. तर पट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पटाचे कार्यक्रम अगदी सुरळीत चालू होते. मात्र ६ मार्च रोजी शेवटच्या वेळी चालू पटदरम्यान अनेक सट्टा शौकिनानी पैशांची होळ (शर्यत) लाऊन चेंगरा चेंगरीचे वातावरण निर्माण केले. त्यामुळे मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य यांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत असताना एका शेतकऱ्याच्या डोक्याला काठी लागली. ही काठी मंडळाचे अध्यक्ष राजू हेडाऊ यांनी मारल्याचा आरोप गर्दीतून झाला. ज्याला काठी लागली त्याचे नाव चंद्रहास परसुरामकर (वय २२ वर्ष राहणार खोडशिवणी) असे आहे. त्याला स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी तत्काळ हलविण्यात आले. दरम्यान, अफवा पसरली की, उपचारादरम्यान सदर जखमीचे निधन झाला. त्यामुळे पटाच्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी अध्यक्ष राजू हेडाऊ यांच्यावर दगडफेक केली. यात पोलिसांच्या वाहनाचेदेखील मोठे नुकसान झाले. पोलिसांनादेखील धक्काबुक्की करण्यात आली. काही कालावधीनंतर पोलिसांनी बळाचा वापर करून जमाव पांगवला.

हेही वाचा – भंडारा : विहिरीत पडलेल्या बिबट्याची तब्बल साडेपाच तासांनंतर सुखरूप सुटका

डुग्गीपार पोलीस स्थानकात हरिचंद्र पंढरी शेंडे यांच्या तक्रारीवरून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंध अधिनियम आणि शासकीय कामात अडथडा निर्माण करणे, अशा विविध कलमांतर्गत ४० ते ५० अज्ञात लोकांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा – बुलढाणा : नऊ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू, मोताळा तालुक्यातील घटना

अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे. सध्या सणाचे दिवस असल्यामुळे अटक वगैरे केली नाही पण लवकरच करू, असे डुग्गीपार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिंगनजुडे यांनी सांगितले.