लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली: जिल्ह्यातील अहेरी आगाराच्या चालत्या बसचे छप्पर उडाल्याप्रकरणी एसटी प्रशासनाकडून गडचिरोली विभागीय यंत्र अभियंता शी.रा. बिराजदार यांना निलंबित करण्यात आले आहे. बुधवारी छप्पर उडालेल्या अवस्थेत धावणाऱ्या बसची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित झाल्याने राज्यभरात याविषयी संताप व्यक्त करण्यात आला होता.

आणखी वाचा- “आत्मविश्वासशून्य हिंदूमुळेच देशावर परकीय आक्रमणे” संभाजी भिडेंचे विधान; म्हणाले, “स्वार्थापोटी सख्ख्या…”

२६ जुलैरोजी दुपारी गडचिरोली- चामोर्शी मार्गावर अहेरी आगाराची (एमएच ४०वाय ५४९४) ही बस छप्पर अर्धवट उडालेले अवस्थेत धावत होती. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून रस्त्यावर सुसाट धावणाऱ्या बसची पुढील वाहनातील एका प्रवाशाने चित्रफीत काढून समाज माध्यमावर टाकली. ही चित्रफीत सर्वत्र प्रसारित झाल्याने माध्यमांमध्येही याविषयी बातम्या प्रसारित झाल्या. याप्रकरणाची एसटी महामंडळाने गंभीर दखल घेत बसच्या दुरुस्तीत हयगय केल्याप्रकरणी गडचिरोली येथील विभागीय यंत्र अभियंता शी.रा. बिराजदार यांना निलंबित केले आहे. महामंडळाने पत्र काढून कोणत्याही बसला नादुरुस्त अवस्थेत प्रवाशांसाठी उपलब्ध करू नये अशी सूचनादेखील राज्यातील सर्व स्थानिक एसटी प्रशासनाला दिली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Divisional mechanical engineer suspended in connection with the roof of a moving bus being blown off ssp 89 mrj
Show comments