लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर : रेल्वेच्या विभागीय रुग्णालयात उपचारादरम्यान एका कर्मचाऱ्याचा मृत्यू, त्यानंतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन आणि काही तास ठप्प झालेले रेल्वेगाड्यांचे संचालन, याचा फटका मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांना बसला. नागपुरातील कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची उचलबांगडी करण्यात आली.

आणखी वाचा-रविकांत तुपकर भूमिगत! निवासस्थानी बंदोबस्त; उद्या रेल्वे रोको आंदोलन

विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाशेजारी असलेल्या रेल्वेच्या रुग्णालयात ५ जानेवारी २०२४ रोजी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सदस्य आक्रमक झाले आणि त्यांनी रुग्णालयावर मोर्चा काढला. तसेच विभागीय व्यवस्थापक कार्यालयात असलेले नियंत्रण कक्षातील कर्मचारी देखील या आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे नियंत्रण कक्षाचे काम सुमारे अडीच ठप्प होते. हा ठपका ठेवून त्यांची बदली करण्यात आली. त्यांना दोन वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण करता आला नाही, असे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने म्हटले आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत मौन बागळले आहे.