दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी गर्दी होत असताना उद्या होणाऱ्या लक्ष्मीपूजनानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण आहे. लक्ष्मीपूजनासाठी लागणारे पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी रविवारी शहरातील बाजारपेठा आणि फटाका मार्केटमध्ये गर्दी झाली होती. दिवाळीचा महत्त्वाचा भाग असलेले लक्ष्मीपूजन उद्या सोमवारी घरोघरी होणार आहे. यावर्षी नरकचतुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहे.

हेही वाचा- राज्यातील तासिका प्राध्यापकांची दिवाळी अंधारातच ! ; मंत्र्यांच्या आदेशानंतरही कार्यवाही नाही

उद्या होणाऱ्या लक्ष्मीपूजनानिमित्त नोटा, नाणी तसेच सोन्या-चांदीच्या शिक्क्यांवरील लक्ष्मीच्या छापांची पूजा करण्याचीही प्रथा असून बाजारात या वस्तूंची खरेदी केली जात आहे. फटाक्यांची आतषबाजी करीत बाल-गोपाळांसह आबाल वृद्धही लक्ष्मीपूजनाचा आनंद घेण्याची तयारी करत आहेत. लक्ष्मीपूजनासाठी लागणारे लाह्या, बत्तासे, बोळके व इतर साहित्य खरेदीसाठीही नागरिकांची दिवसभर लगबग सुरू होती. उद्या सकाळी अभ्यंग स्नानानंतर सायंकाळी घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाईल.

हेही वाचा- विदर्भातही ‘एक्सबीबी’ उपप्रकाराचे करोनाग्रस्त; नागपूर, भंडारा, अकोल्यात नोंद

यंदा परतीच्या पावसामुळे फूलशेतीचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे बाजारात शेवंती, झेंडूची, गुलाब आदी फुले महागली आहे. लक्ष्मी पूजनासाठी फुले लागतात. यंदा अतिवृष्टीने फूलशेतीचे मोठे नुकसान झाल्याने आवकेवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या पाच दिवसात फुलांची आवक वाढली असली तरी दर मात्र कमी झाले नाही. सध्या दीडशे ते दोनशे रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे, तर झेंडूच्या आणि शेवंतीच्या माळा शंभर दीडशे रुपये प्रतिमाळ विक्री होत आहेत.

हेही वाचा- करोनामुळे पालक गमावलेल्यांचा शैक्षणिक खर्च शासन करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

या वेळेत होणार लक्ष्मीपूजन

लक्ष्मीपूजनासाठी दुपारी १२.१० ते ४:३० पर्यंत व सायंकाळी पावणेसहा ते रात्री ८.३३ वाजेपर्यंत, रात्री ९.१० ते १२.२१ पर्यंत लक्ष्मीपूजनासाठीचा शुभ मुहूर्त आहे, अशी माहिती प्रिती राजंदेकर यांनी दिली.

Story img Loader