नागपूर: निधीचा तुटवडा निर्माण झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीत दिवाळी भेट रक्कम मिळाली नाही. सण उचल मिळाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी काळी असतांनाच सरकारकडून प्रवासी कराच्या नावाने वसुली सुरू आहे, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
एसटी महामंडळाकडे निधीचा तुटवडा निर्माण झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीत दिवाळी भेट रक्कम मिळाली नाही. सण उचल मिळाली नाही. पी. एफ. ग्राज्युटी सारखी देणी थकली असताना एसटीकडून प्रवाशाना दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या सवलतीची सरकार कडून मिळणारी रक्कम म्हणजेच सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कमेतून प्रवाशी कराची, समायोजन या गोंडस नावाखाली वसुली करणे हे निंदनीय असून एसटी व कर्मचारी या…