लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अकोला : नैसर्गिक संकटामुळे शेतातील उभे पीक गमावलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारातच गेली. शासनाने मदत जाहीर करून दिवाळीपूर्वी देण्याचे जाहीर केले. मात्र, अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मदतीची प्रतीक्षा लागली आहे. शासन व मंत्र्यांचे आदेश हवेतच विरले असून शेतकऱ्यांना मदत मिळणार तरी केव्हा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अकोला जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये अनियमित पाऊस झाला. जुलैमध्ये जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. काही भागांत अतिवृष्टी होऊन जमीन खरडून गेली. अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात एक लाख ६८ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी हवालदिल झाला. ३ ऑक्टोबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत नुकसानीची मदत मंजूर करण्यात आली. दिवाळीच्या सणापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणे अपेक्षित होते. शासनाने देखील तसे वारंवार जाहीर केले.
आणखी वाचा-नागपूर रेल्वे स्थानकावर बॅटरी कारची प्रवाशांना धडक
मात्र, दिवाळसण उलटून गेला तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीची मदत अद्याप मिळाली नसल्याचे चित्र आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मंजूर करण्यात आलेली मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार झाल्या आहेत. मात्र, तयार करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली नाही. अतिवृष्टीग्रस्त दोन लाखावर शेतकऱ्यांना मदत प्राप्त झालेली नसल्याने त्यांची दिवाळी आर्थिक अडचणीतच गेली आहे.
अकोला तालुक्यात सर्वाधिक नुकसानग्रस्त
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त सर्वाधिक शेतकऱ्यांची संख्या अकोला तालुक्यातील आहे. अकोला तालुक्यातील ५९ हजार ९८१, बाळापूर ४४ हजार ७८६, बार्शिटाकळी ४२ हजार ४६९, तेल्हारा ३९ हजार ६९६, मूर्तिजापूर १६ हजार १३३, अकोट दोन हजार ४३१ व पातूर तालुक्यातील ४४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण दोन लाख तीन हजार १०९ शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा लागली आहे.