नागपूर : रविवारी दिवाळीनिमित्त बर्डी बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली असताना दुपारी अडीचच्या सुमारास मोदी नंबर एकमधील एका दुकानाला आग लागली. मात्र अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
दिवाळी पाच दिवसांवर आली आहे. रविवार असल्याने प्रसिद्ध बर्डी बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दुपारी २.३० च्या सुमारास मोदी नंबर १ मध्ये एका दुकानातून धूर निघताना दिसला. थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. शेजारी रेडिमेड गारमेंटचे दुकान होते. आग पसरत असतानाच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा सुरू केला. परिणामी आग पसरली नाही. आगीमुळे दुकानाचे किती नुकसान झाले हे कळू शकले नाही. तसेच आगीचे कारणही कळू शकले नाही. अग्निशमन व पोलीस विभाग तपास करत आहे.
हेही वाच – उपराजधानी आता राजधानी वाटेवर, ‘पीएम २.५’चे प्रमाण वाढले
आणखी एक आग
दरम्यान रविवारी सकाळच्यावेळी लकडगंज परिसरात मुरली ॲग्रो लिमिटेड या कंपनीला आग लागली असून त्यात लाखो रुपयांची हानी झाली.