नागपूर: नागपूर जिल्ह्यात १८ ते २१ जुलै २०२३ या दरम्यान मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेली आहे.या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभाग ( डिजास्टर मॅनेजमेंट एथॉरिटी- डीएम ) सजग झाला असून त्यांनी नागरिकांना सूचना केल्या आहेत.
वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक असून चुकून सुद्धा झाडा खाली उभे राहू नये. नदी व नाल्याच्या पुलावरून जर पाणी वाहत असेल तर धाडस करून कुठल्याही प्रकारे पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.नदी, तलाव व धरणे या ठिकाणी नागरिकांनी विशेष: युवकांनी पाण्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नये., असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळवले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर.जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूरसंपर्क क्र: ०७१२-२५६२६६८ येथे संपर्क साधावा