अविष्कार देशमुख
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जाहिरातबाजीला बळी पडू नका : ‘नीरी’चा सल्ला
प्रभावी जाहिरातबाजीला बळी पडून नागपूरकरांमध्ये घराघरात आर ओ फिल्टर (रिव्हर्स ऑस्मॉसिस) बसवण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. मात्र, शहरात नळावाटे येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा दर्जा अगदी योग्य आहे. हे पाणी पुन्हा फिल्टर करण्याची गरज नाही, असे ‘नीरी’ने (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था) स्पष्ट केले आहे. केवळ नळाचेच नाही तर शहरातील बोरिंग आणि विहिरीचे पाणीसुद्धा पिण्यायोग्य असल्याचेही नीरीचे म्हणणे आहे.
नीरीने याबाबत दिलेल्या अधिक माहितीनुसार, राज्यात नागपुरातील पिण्याच्या पाण्याच्या दर्जा सर्वात चांगला आहे. मात्र, शहराच्या काही भागात जुन्या नळवाहिन्या असल्यामुळे पिण्यायोग्य पाणी मिळत नाही. फक्त याच भागात योग्य प्रकारचे फिल्टर्स बसवून आपण चांगले पाणी मिळवू शकतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये आर ओ फिल्टर्स वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. आर ओ फिल्टर्समधून कितीही खारे किंवा अशुद्ध पाणी शुद्ध आणि गोड होऊन येते. त्यामुळे हे फिल्टर्स अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहेत. पण, त्याचा सर्रास वापर घातक ठरू शकतो. शहरातील पाण्यात हवे असलेले सर्व मिनरल्स बऱ्यापकी आहेत. तरीही नागपूरकर विविध कंपन्यांचे आर ओ फिल्टर्स खरेदी करीत आहेत. ज्याची मुळात गरजच नाही. नीरीने शहरातील पाण्याची गुणवत्ता तपासली असता त्यामध्ये १८० ते १९० टीडीएस (टोटल डिझॉल्व्ह सालिड) प्रमाणात असल्याचे आढळून आले. पाण्यातून प्रत्येकाला दररोज २०० एमजी कॅल्शियम आणि २०० एमजी मॅग्नेशियम आवश्यक आहे. मात्र नागपूरच्या पाण्यात त्याचे प्रमाण योग्य असून आपण ते आर ओच्या माध्यमातून काढून टाकतो, याची जाणीव मात्र कोणालाच नाही. जेथे ५००-७०० टीडीएसचे पाणी आहे. तेथे टीडीएस २०० करण्यास आर ओ आवश्यक आहे. विशेष म्हणजे, लहानपणापासून आर ओचे पाणी पिणाऱ्यांना भविष्यात हाडांचे त्रास होण्याची दाट शक्यता असते, याकडेही नीरीने लक्ष वेधले.
टीडीएस म्हणजे काय?
टीडीएस म्हणजे ‘टोटल डिझॉल्व्हड सॉलिड’ अर्थात त्या पाण्यात विरघळलेले एकूण घनपदार्थ मुख्यत: कॅल्शिअम काबरेनेट, मॅग्नेशिअम सल्फेट यासारखे क्षार. हे क्षार मानवाला पाण्यातून मिळतात आणि ते मर्यादित प्रमाणात आवश्यक असतात. २०० मिलीग्रॅम प्रतिलिटर टीडीएसचे पाणी पिण्यायोग्य असते. त्यापेक्षा कमी टीडीएस असलेले पाणी प्याले तर शरीराला आवश्यक असलेले मिनरल्स कमी प्रमाणात मिळतात आणि आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. टीडीएस अधिक असेल तर मुतखडय़ांसारख्या तक्रारी सुरू होतात. एकूणच योग्य टीडीएस असेल तरच आपण निरोगी राहतो. शहरातील नळाच्या पाण्याचे टीडीसएस १८० ते १९० आहे. त्यामुळे फिल्टरची गरजच नाही.
नागपुरात नळाचे पाणी पिण्यायोग्य , टीडीएस प्रमाणबद्ध आहे. जमिनीतील पाण्यात देखील आवश्यक सर्व मिनरल्स आहेत. नागपूरकरांना आर ओची फारशी गरज नाही. नियमित आर ओचे पाणी पिल्याने भविष्यात हाडांचा त्रास होऊ शकतो. आर ओ वापरणाऱ्यांनी २०० टीडीएसपर्यंत आर ओ सेट करावे.
– अतुल मालधुरे, जलतज्ज्ञ नीरी, नागपूर</p>
शहरात उन्हाळ्यात आर ओच्या मागणीत वाढ होते. आमचे आर ओ प्रतिनिधी योग्य टीडीएस सेट करून देत असतात आणि त्याची नियमित तपासणी होत असते. नागपूरचे पाणी पिण्यायोग्य असले तरी शहराच्या अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने आर ओची मागणी कायम असते.
– ए.के.गांधी, संचालक ए.के.गांधी सेल्स