नागपूर : अनेक ठिकाणी प्रवेशद्वारासमोर लाल रंगाची प्लॉस्टिक बॉटल ठेवल्यास दिसून येते. असे केल्याने भटके श्वान घाण करीत नाही, असा समज आहे. या लाल रंगाचा आणि श्वानांचा काय संबंध आहे. खरंच श्वान लाल रंगाची बॉटल बघून घाण करीत नाहीत. जाणून घ्या काय तज्ज्ञ काय म्हणतात.
भटके कुत्र्यांच्या त्रासाने अनेक सोसायटीमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. हे श्वान घरात प्रवेश करतात आणि घाण करून ठेवतात. एवढेच नव्हेतर काही श्वान पाळणारे सकाळी किंवा सायंकाळी त्यांच्या पाळीव प्राण्याला घेऊन परिसरात फिरतात. यावेळी ते रस्त्याच्याकडेला, रस्त्यावर किंवा एखाद्या घराच्या प्रवेशद्वारासमोर देखील घाण करतात. या त्रासाला कंटाळलेल्या नागपुरातील मनिषनगर, शिल्पा सोसायटीमधील रहिवाशांनी क्लृती शोधून काढली आहे. कुत्र्यांना घाबरवण्यासाठी या भागात अनेकांच्या प्रवेशद्वारासमोर लाल रंगाने भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचे ठेवल्याचे विचित्र दृष्य आहे. असे केल्याने भटके श्वास घरात प्रवेश करणार नाहीत किंवा प्रवेशद्वारात घाण करणार नाही असा त्यांचा समज आहे.
हेही वाचा… भंडारा : पुलाच्या कामासाठी आलेली क्रेन नदीपात्रात अडकली
हेही वाचा… विदर्भातील पहिला ओडीएफ प्लस तालुका घोषित, वाचा सविस्तर
यासंदर्भात तज्ज्ञ काय म्हणातात, प्राण्यांना लाल रंगाची ऍलर्जी असते आणि त्यांना राग येतो. त्यामुळे ते तिथे जाणे टाळतात. डोळ्याच्या अंतर्गत रचनेनुसार श्वानांना लाल, निळा आणि हिरवा रंग ओळखता येत नाही. त्यांना दूर ठेवण्यासाठी लाल रंगाचा वापर हा काही रामबाण उपाय होऊ शकत नाही.