इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)च्या आकस्मिक विभागात शनिवारी मध्यरात्रीनंतर सेवेवर असलेल्या डॉ. अनिल चव्हाण यांच्यासह सुरक्षारक्षकाला मारहाण झाली. रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी परिचारिकेसोबतही असभ्य व्यवहार केल्याने मेयोच्या निवासी डॉक्टरांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या घटनेने रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. महम्मद शहजाद (१८) व त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
महम्मद शहजाद याला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे उपचाराकरिता दोन नातेवाईकांनी मेयोत आणले. मुख्य वैद्यकीय कक्षात रुग्णाच्या आजारासह त्याची माहिती विचारल्यावर आकस्मिक विभागात सेवा दिली जाते. मेयोच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णावर उपचार सुरू झाले. दरम्यान अचानक रुणाच्या साथीदारांनी त्याला उचलून बाहेर आणले. बरोबर उपचार करीत नसल्याचा ठपका ठेवत ते डॉक्टरांना धमक्या देऊ लागले आणि मारहाण करण्यास सुरुवात झाली. सुरक्षारक्षक पराग बडोले डॉक्टरांच्या मदतीसाठी आले असता त्यालाही मारहाण झाली. तहसील पोलिसांना कळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. त्यापूर्वी डॉ. चव्हाण यांना मारहाण झाली होती. महम्मदच्या मित्रांनी डॉक्टरांवर हल्ला चढवला. मारहाणीची सारी दृष्ये मेयोतील सीसी कॅमेरात चित्रित झाली असून माहिती कळताच मेयोचे अधिष्ठाता डॉ. मधुकर परचंड घटनास्थळी पोहोचले होते. त्यांच्या मध्यस्तीने काही तासात रुग्णसेवा सुरू झाली.
मेयोत डॉक्टरांना मारहाण, तणाव ; निवासी डॉक्टरांमध्ये असंतोष
महम्मद शहजाद (१८) व त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-10-2015 at 00:01 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor assault in indira gandhi government medical hospital