भंडारा : भंडारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेला एक गोपनीय कॉल आला, “एका लॉजमध्ये शे-पाचशे माणसांची भली मोठी गर्दी झाली आहे, मात्र ही गर्दी लॉजमध्ये बुकिंग करणाऱ्यांची नव्हे तर रुग्णांची आहे. हे रुग्ण एका डॉक्टरकडे तपासणीसाठी आले आहेत. विशेष म्हणजे स्वतःला मुंबईचा सुप्रसिध्द डॉक्टर म्हणविणाऱ्या या डॉक्टरने रुग्णांना देण्यासाठी एका पोतडीत औषध भरून आणली आहेत आणि तो आयुर्वेदिक, ॲलोपॅथी अशा विविध रोगांवर खात्रीलायक औषध देण्याचा दावा करीत आहे.” अशी माहिती मिळताच पोलिसांनी लॉज गाठले आणि नियमबाह्य औषधिविक्री करणाऱ्या डॉक्टरला ताब्यात घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भंडारा बसस्थानकाजवळील रसना लॉजमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आज सोमवारी सकाळी १० वाजता मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने धाड टाकताच येथे एक डॉक्टर रुग्णांना तपासात असल्याचे आणि त्याच्या जवळ एका पोतडीत विविध प्रकारच्या औषधी वेगवेगळ्या पॉलीथिनमध्ये असल्याचे दिसून आहे. त्याचे सुमारे ५०० रुग्ण तपासून झालेले होते तर पाचशे रुग्ण तपासून घेण्यासाठी रांगेत होते. डॉ. राजेंद्र बाबुराव डाबरे असे या डॉक्टरचं नाव असून मुंबईतील सुप्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर असल्याचे त्यांनी त्यांच्या पत्रकात लिहिले आहे.

आणखी वाचा-Video: एसटी आगारात चालक-अधिकार्‍यांमध्ये हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

२०२२ पासून भंडारा येथे येऊन डॉ. राजेंद्र डाबरे हा सर्व प्रकार करीत आहेत. दर महिन्याच्या सोमवारी ते या लॉजवर रुग्ण तपासणीसाठी येतात. यासंदर्भात त्यांनी एक पत्रक सुध्दा प्रकाशित केले असून ते सर्वत्र वाटले जाते.

या डॉक्टरचे राहण्याचे ठिकाण नागपुर येथील पत्ता असून बीएएमएस, सीसीएच, सीजीओ अशा वैद्यकीय पदव्या प्राप्त केल्याचे डॉक्टर रुग्णांना सांगतो. दमा, संधीवात, आमवात, ठणक्यावात, आम्लपित्त, मुत्रविकार एवढेच नाही तर स्त्रियांचे आजार, मूलबाळ न होणे, गुप्तरोग, लैंगिक आजार, मधुमेह, अर्धांगवायु/लकवा, इत्यादी आजारांवर खात्रीशिर औषध देवून मोफत तपासणी करून औषधीकरिता ३५० रुपये आकारले जात होते. याशिवाय मुतखडा, मुळव्याध, त्वचारोग, वजन कमी करणे या आजारांकरिता ७०० रुपये औषधी खर्च तर दारू सोडविण्याकरिता ५०० रुपये रुग्णांकडून घेतले जायचे. याशिवाय विविध रोगांसाठी ३०० ते ७०० रुपये औषधांचे घेतले जायचे. सकाळी ८ ते रात्री ८ असे १२ तास रुग्णाची रीघ लागलेली असायची.

आणखी वाचा-दिवाळीच्या तोंडावर सहा दिवसात सोन्याच्या दरात मोठे बदल, हे आहेत आजचे दर…

धाड पडल्यानंतर डॉक्टरसह त्याच्या सोबत असलीस तरुणांनी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिस गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शेवाळे, जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

तरुणांना हाताशी घेऊन धंदा..

किराणा भरून आणवा अशाप्रकारे औषध एका पोतडीत भरून आणली जातात. डॉक्टर वाबरे यांच्या हाताखाली ४ ते ५ तरुण पोरं असून ते औषधी वाटप करीत असतात. हे तरुण कोण याचाही तपास सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor from mumbai who was selling illegal drugs was arrested in bhandara ksn 82 mrj