नागपूरः मेडिकल रुग्णालयातील वसतिगृहात १३ जुलैच्या रात्री एका महिला डॉक्टरच्या आंघोळीची चित्रफीत बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ. दर्शन अग्रवाल या निवासी डॉक्टरची प्रशासनाने वसतिगृहातून हकालपट्टी केली. त्याची आता विशाखा समितीकडूनही चौकशी सुरू झाली असून पहिली बैठक सोमवारी झाली.
मेडिकलमध्ये पदव्युत्तरच्या द्वितीय वर्षाला शिकणारी महिला निवासी डॉक्टर आंघोळीला गेली असता डॉ. दर्शन याने तिचे भ्रमणध्वनीवर चलचित्र काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार निदर्शनात आल्यावर विद्यार्थिनीने आरडाओरड केल्यावर तेथील विद्यार्थ्यांनी डॉ. दर्शनला पकडून चोप दिला. महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून डॉ. दर्शनला अटक केली.
दरम्यान, मेडिकलकडून नियुक्त सहा सदस्यीय समितीनेही डॉ. दर्शनला दोषी ठरवले आहे. हा अहवाल मेडिकल प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण खात्याला सादर केला असून त्यांच्या सूचनेनुसार आता डॉक्टरवर कारवाई होणार आहे. तर दुसरीकडे आता डॉ. दर्शनची वसतिगृहातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची मेडिकलमधील विशाखा समितीकडूनही चौकशी सुरू झाली आहे. पहिली बैठक सोमवारी झाली असून यावेळी समितीच्या सदस्यांकडून पीडिता आणि आरोपी डॉ. दर्शन दोघांनाही त्यांचे म्हणने मांडण्यासाठी बोलावले. तर या प्रकरणाशी संबंधित इतर प्रत्यक्षदर्शींचेही म्हणणे समिती नोंदवून घेणार आहे.
हेही वाचा >>>लक्ष विचलित करण्यासाठी भाजपची ‘कलंक’ची नामी युक्ती
वसतिगृहात आता दोन गृहपाल
अश्लील चित्रफीत प्रकरण पुढे आल्यावर मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी पुन्हा येथे अशा घटना घडू नये म्हणून विद्यार्थ्यांशी वेळोवेळी संवाद साधत मुले व मुलींसाठी एकाच वास्तूत वेगवेगळी विभागणी करून दिली. सोबत मुले व मुलींना आपल्या समस्या मांडण्यासाठी एक पुरुष व एक महिला असे दोन गृहपाल अतिरिक्त कारभार देऊन उपलब्ध केले आहे. तर येथे आवश्यक संख्येने सुरक्षा रक्षकही नियुक्त करण्यात आले आहे.
मेडिकलमधील मुलांना चांगले शिक्षण व काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण मिळावे म्हणून प्रशासनाने वसतिगृहात महिला व पुरुष असे दोन गृहपाल देण्यासह मुले व मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय केली आहे. या प्रकरणातील आरोपी विद्यार्थ्याची वसतिगृहातून हकालपट्टी केली असून त्यावर वैद्यकीय संचालक कार्यालयाच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येईल.- डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल रुग्णालय.