हत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल तयार करणाऱ्या डॉक्टरने न्यायालयात साक्ष देण्यास टाळाटाळ केल्याने त्यांना न्यायालयाच्या आदेशाने पुणे येथून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना एक दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

हेही वाचा >>>चंद्रपूर: ताडोबात वाघ ८७ तर बिबट १२८; काळा बिबट विशेष आकर्षण

व सत्र न्यायालयातील न्यायाधीश व्ही. बी. गव्हाणे यांच्या न्यायालयात २०१८ मध्ये घडलेल्या हत्या प्रकरणातील खटल्यात साक्षीदार म्हणून सर्वोपचार रुग्णालयातील तत्कालीन डॉ. महेश रोहिदास साबळे यांना न्यायालयात साक्ष देण्यासाठी समन्स बजावण्यात आला होता. वारंवार साक्ष देण्यास अनुपस्थित राहिल्यामुळे न्यायालयाने उपस्थित राहण्याचा वॉरंट बजावला, त्यानंतरही ते साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर झाले नाही. त्यामुळे न्यायालयाने त्यांना अटक करण्याचे आदेश दिले. अकोला पोलिसांनी डॉ. महेश साबळे यांना पुणे येथून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. जिल्हा कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. साक्ष न देणे डॉक्टरला चांगलंच भोवल्याची चर्चा आहे.