नागपूर : नागपुरातील एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर विद्यावेतनाच्या मागणीवरून कामबंद आंदोलनावर दुसऱ्याही दिवशी ठाम आहे. तोंडावर पट्या लावून विद्यार्थ्यांनी ही मागणी लावून धरली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी शुक्रवारी सकाळपासून वाढीव विद्यावेतनाच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दुसऱ्याही दिवशी निवासी डॉक्टरांचे आंदोलन कायम होते. विद्यार्थ्यांनी सकाळी महाविद्यालयाशी संलग्नित लता मंगेशकर रुग्णालयाच्या पुढे एकत्र येत तोंडावर काळ्या मुखपट्टी लावत प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. वाढीव विद्यावेतनाशिवाय माघार घेणार नसल्याचाही इशारा आंदोलकांनी दिला.
हेही वाचा >>>‘‘नागरिकांच्या सहकार्यानेच नक्षलवाद संपवू,” नक्षल्यांच्या गडातून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा इशारा…
दरम्यान, महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांसोबत वेळोवेळी संपर्क साधून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली जात आहे. परंतु त्याला यश मिळाले नाही. तर प्रशासनाकडून आंदोलक विद्यार्थ्यांसोबत या प्रश्नावर काही बैठकीही झाल्या. परंतु वाढीव विद्यावेतनाशिवाय माघार घेणार नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे येथे आंदोलन कायम असल्याने लता मंगेशकर रुग्णालयातील विविध वार्डातील डॉक्टरांची संख्या खूपच कमी झाली आहे. त्यामुळे येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना प्रचंड मन:स्ताप होत आहे.
हेही वाचा >>>दुचाकीचा धक्का लागल्याचे कारण झाले अन् भररस्त्यात तरुणाला संपवले
दरम्यान राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने राज्यातील सर्वच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना निवासी डॉक्टरांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांप्रमाणे विद्यावेतन देण्याची सूचना केली आहे. त्यानंतरही नागपुरातील एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना शासकीय महाविद्यालया एवढे विद्यावेतन दिले जात नाही. या विषयावर येथील विद्यार्थ्यांनी वेळोवेळी प्रशासनला निवेदन दिले. परंतु काहीही होत नसल्याने शेवटी शुक्रवारपासून कामबंद आंदोलन केले गेले. परंतु हे आंदोलन करतांना पहिल्या टप्यात निवासी डॉक्टर आकस्मिक अपघात विभागासह आपत्कालीन विभागात सेवा देत आहेत. परंतु आंदोलन वाढल्यास आंदोलक या सेवेबाबतही विचार करण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
नागपुरातील एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट या खासगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध विषयांचे सुमारे १२५ ते १५० विद्यार्थी पदव्यूत्तरचे शिक्षण घेत असतात. त्यामुळे तीन वर्षांतील विद्यार्थ्यांची संख्या पकडली तर सुमारे ४०० विद्यार्थी आहे. त्यापैकी संपावरील विद्यार्थी वगळले तर सध्या आपत्कालीन सेवेत केवळ ४० निवासी डॉक्टरच सेवा देत आहे.