शेतातील हिरव्या शेंगा सोलून टरफले ताटात टाकली. तेव्हाच महिलेच्या गळ्यातील अंदाजे तीन ते साडेतीन तोळ्याची सोन्याची पोथ ताटात तशीच राहिली. हेच टात म्हशी समोर ठेवले. तीने हिरव्या शेंगा सोबत सोन्याची पोथ फस्त केली. मात्र ही बाब लक्षात येताच घरातील सर्वांची एकच धांदल उडाली. आणि त्यांनी जनावरांच्या डॉक्टरांना फोन केला आणि मग सुरू झाली तिच्या पोटातील पोथ काढण्याची प्रक्रिया… मंगरूळपीर तालुक्यातील सार्सी येथील शेतकरी रामहरी भोयर हे शेती करतात. त्यांच्याकडे म्हैस देखील आहे.
हेही वाचा >>> सणासुदीच्या काळात दोन विशेष रेल्वेला मुदतवाढ, उत्तर-पश्चिम भारतात जाण्यासाठी…
सध्या शेतात हिरव्या शेंगा आलेल्या आहेत. रात्रीच्या वेळी घरातील महिलांनी हिरव्या शेंगाची टरफले ताटात काढली. आणि रात्री झोपताना गळ्यातील अंदाजे तीन तोळे सोन्याची पोठ ताटात काढून ठेवली. मात्र हेच ताट म्हशी समोर ठेवले. म्हशीने हिरव्या शेंगा सोबत सोन्याची पोथ देखील फस्त केली. तेवढ्यात लक्ष्यात आले की, त्या ताटात सोन्याची पोथ ठेवली होती. हे बघून घरातील सर्वाची एकच धांदल उडाली. त्यांनी तातडीने जवळचे डॉकटर ज्ञानेश्वर इढोळे यांना कळविले. त्यांनी तातडीने वरिष्ठ डॉक्टरांसोबत संपर्क साधला आणि म्हशीला घेऊन वाशीम येथील जनावराच्या रुग्णालयात पोहचले. मेटल डिटेक्शन वरून म्हशीच्या पोटात काहीतरी असल्याची खात्री करण्यात आली त्यानंतर म्हशीची सोनोग्राफी करून डॉक्टर बाळासाहेब कौंडिन्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हशीची यशस्वी शस्त्रक्रिया केली व तिच्या पोटातील सोन्याची पोत बाहेर काढली. हे बघून घरातील मंडळी व डॉक्टरांनी सुटकेचा नीश्वास सोडला.या घटनेची सर्वत्र चर्चा रंगत आहे.