नागपूर: शहरालगत असलेल्या झुडपी जंगल क्षेत्रात मानवी वस्तीचा हस्तक्षेप अधिक वाढल्याने साप निघण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. सापाचा धोका मुख्यत्वे नदी, नाले असलेल्या मानवी क्षेत्रात अधिक जाणवतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सापाला वन्यजीव सरक्षंण अधिनियम १९७२ अनुसार संरक्षण प्राप्त आहे. त्यामुळे सापांची छेडछाड करणे, सापाला इजा पोहचवणे, सापांची हत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे केल्यास आर्थिक दंडासह तुरुंगवासही होऊ शकतो.
सापाचे विषारी, बिन विषारी, निमविषारी असे प्रकार आहेत.नाग, मन्यार, घोणस, फुरसे, पोवळा साप हे विषारी साप आहेत. तर अजगर, तस्कर, कवडया, धूळनागिन, डुरक्या घोणस, मांडोळ, कूकरी, पानदिवड, गवत्या साप, धामन, पिवळ्या ठिपक्याचा कवड़या साप, रुखई साप, जाड़ रेती साप, नानेटी, रसल कूकरी साप हे बिनविषारी साप असतात. मांजऱ्या साप, हरणटोळ, भारतीय अंडे खाऊन साप हे निमविषारी प्रकारात मोडतात.
हेही वाचा… तलाठी परीक्षेचे सर्व्हर डाऊन; परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ आणि…
सापांचा खेळ दाखवणारे लोक पैशापोटी सापांचे दात काढून घेतात अथवा त्यांच्या विषारी ग्रंथी काढून घेतात. त्यांना अनेक दिवस उपाशी ठेवतात. नागपंचमी हसणाला त्यांच्या समोर दूध ठेवले जाते. म्हणून उपाशी असल्याने साप दूध पितो. दूध प्यायल्याने सापाचा जीव मात्र धोक्यात येतो. दूध प्यायल्याने सापाचे फुफ्फुसे आणि आतडेही खराब होतात आणि नंतर काही दिवसांनी त्याचा मृत्यू होतो. म्हणूनच सापांना कधीही दूध पाजू नये.
हेही वाचा… …म्हणून शिंदे स्वप्नातही मुख्यमंत्री पदाची खुर्ची पकडून ठेवतात; वडेट्टीवार यांचा टोला
दूध हे सापांचे अन्न नाही, साप सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये येत असून पूर्णपणे मांसाहारी असतात. सापांचे मुख्य खाद्य बेडूक, उंदीर, पक्षी, सरडे, इतर लहान साप असे आहे. साप दूध पितो हे पूर्णपणे चुकीचे आहे. ही एक चुकीची पारंपरिक अंधश्रद्धा आहे. याप्रमाणे सापविषयी अनेक अंधश्रद्धा समाजात आढळतात. सापाच्या डोक्यावर मणी असतो, सापाला केस असतात, साप धनाचे रक्षण करतो, साप पाठलाग करतो, साप पुंगीवर नाचतो, साप बदला घेतो, साप दूध पितो, साप १०० वर्ष जगतो, विशिष्ठ सापामुळे धन लाभ होतो. ह्या निव्वळ अंधश्रद्धा आहेत. सर्पदंश झाल्यास मंत्रोपचाराने विष उतरवणाऱ्या मांत्रिकाकडे न जाता थेट रुग्णालय गाठावे, असा सल्ला डॉक्टर देतात.