नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) स्पर्धा परीक्षार्थींना परीक्षांची तयारी योग्यरितीने करता यावी, परीक्षा नेमक्या कधी होणार, याचा अंदाज यावा म्हणून दरवर्षी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते.

२०२४च्या संभाव्य वेळापत्रकामध्ये आयोगाने १६ परीक्षांचा तपशील जाहीर केला होता. यापैकी अद्याप ११ परीक्षा प्रलंबित असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या २०२५च्या संभाव्य वेळापत्रकावरून दिसून येते. विशेष म्हणजे काही परीक्षा झाल्या तर काहींचे निकाल नाही, तर काहींचे अभ्यासक्रमही जाहीर व्हायला असल्याचे दिसून येते.

CET exam applications marathi news
सीईटीचे अर्ज भरण्यासाठी अजून एक संधी, दुसऱ्यांदा मुदतवाढ; पाच अभ्यासक्रमांचे अर्ज १० फेब्रुवारीपर्यंत भरता येणार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
mpsc exam latest news in marathi
MPSC Exam 2025: ‘एमपीएससी’ परीक्षेसाठी मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही, पोलीस आणि…
bhandara large scale scam in mpsc exams emerged with links reaching Bhandara district
एमपीएससी घोटाळ्याचे धागेदोरे भंडाऱ्यापर्यंत; संशयित चौकशीसाठी ताब्यात
tet conducted by Maharashtra State Examination Council has been declared final result
टीईटीचा अंतरिम निकाल जाहीर
Why is there a delay in the appointment of candidates who have passed MPSC
कोलमडलेले वेळापत्रक, न्यायालयीन विलंब, लालफीतशाही… ‘एमपीएससी’ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीस विलंब का होतो?
mpsc exam Indian economy
एमपीएससी मंत्र: गट ब सेवा पूर्व परीक्षा : अर्थव्यवस्था
SET Examination Scheduled For 15th June Via Offline Mode
सेट परीक्षा लांबणीवर, आता कधी होणार परीक्षा?

आणखी वाचा-काँग्रेसच्‍या नेत्‍यांनी बंडखोराला रसद पुरवली, ‘या’ पराभूत उमेदवाराचा आरोप

‘एमपीएससी’कडून दोन दिवसांपूर्वी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यात पुढील वर्षाचे नियोजन आणि २०२४ मधील प्रलंबित परीक्षांची माहिती व त्यांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यावरून २०२४ मध्ये जाहीर झालेल्या जवळपास ११ परीक्षा प्रलंबित असल्याचे दिसून येते. मागील काही वर्षांपासून ‘एमपीएससी’कडून परीक्षांच्या वेळापत्रकाचे पालन होत नाही अशी तक्रार असते. २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रकही विस्कळीतच आहे. अनेक पूर्व परीक्षा आणि काही परीक्षांचे निकाल रखडले आहेत. त्यामुळे उमेदवारांचे पूर्ण वर्ष वाया गेले आहे. आयोगाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेची जाहिरात जानेवारी २०२५ मध्ये येणार असून परीक्षा सप्टेंबर २०२५ मध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, २०२४ च्या परीक्षाच पूर्ण न झाल्याने २०२५च्या परीक्षा कशा होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आणखी वाचा-केवळ दहाच आमदार आल्यामुळे त्यांचे राजकारणातून संपले… आत्राम यांची शरद पवार यांच्यावर टीका

अशा आहेत प्रलंबित परीक्षा

  • महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा २०२३- सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
  • यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा – मागणीपत्र नाही.
  • महाराष्ट्र वनसेवा परीक्षा – मागणीपत्र नाही.
  • महाराष्ट्र गट-ब(अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ – पूर्व परीक्षा प्रलंबित
  • महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२४- पूर्व परीक्षा २ फेब्रुवारी २०२५
  • महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ – मुख्य परीक्षा २१ जून २०२५
  • न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४- जाहिरात प्रलंबित.
  • महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा २०२४ – पूर्व परीक्षा १ डिसेंबर.
  • महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ – मुख्य परीक्षा १० मे
  • स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४- मुख्य परीक्षा १८ मे २०२५
  • कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ – मुख्य परीक्षा १८ मे २०२५.

Story img Loader