नागपूर : भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खाऊ घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, श्वानप्रेमींनी कुत्र्यांना दत्तक घेऊन घरी न्यावे आणि त्यांना खाऊ घालावे, असे आदेश नागपूर उच्च न्यायालयाने दिले होते. याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाच्या आदेशात सुधारणा करीत कुत्र्यांना रस्त्यावर खाऊ घालण्यासाठी दत्तक घेण्याची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला. 

२२ ऑक्टोबर रोजी आदेश देताना उच्च न्यायालय म्हणाले होते, भटक्या श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालू नये. ज्यांना श्वानांना खायला द्यायचे आहे, त्यांनी आधी त्यांना दत्तक घ्यावे व त्यांची महापालिकेत नोंदणी करावी किंवा त्यांना आश्रयगृहात ठेवावे. तसेच धोकादायक श्वानांना ठार मारणे, त्यांची नसबंदी करणे व त्यांना आश्रयगृहात ठेवणे याविषयी कायद्यामध्ये असलेल्या तरतुदींचे काटेकोर पालन करावे. पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांनी यासंदर्भात मुंबई पोलीस कायद्यांतर्गत कारवाई करावी, असेही उच्च न्यायालयाने सांगितले होते. त्यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप नोंदवत उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल केली होती. 

supreme-court-
“प्रत्येक वैयक्तिक मालमत्ता समाजासाठी उपयुक्त संपत्ती असू शकत नाही”, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Supreme Court Verdict on Madrasa Education Act
UP Madarsa Act: मदरसा शिक्षण मंडळ कायदा घटनात्मक; सर्वोच्च न्यायालयाचा योगी आदित्यनाथ सरकारला झटका, उच्च न्यायालयाचा निकाल फेटाळला
Which of the raw and pasteurized milk is beneficial
कच्चे व पाश्चराइज्ड यापैकी कोणते दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून…
leopard trapped Surgana Taluka Avalpada,
आदिवासी महिलेच्या धैर्यामुळे मुलांची सुटका अन बिबट्या बंदिस्त
over12 lakh citizens in maharashtra vaccinated against tuberculosis
राज्यामध्ये १२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे झाले क्षयरोग लसीकरण; मुंबईमध्ये अद्याप लसीकरण मोहीमेला सुरुवात नाही
jewellery worth two lakh stolen from woman at swargate st bus depot
दिवाळीत एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट; स्वारगेट एसटी स्थानकात महिलेकडील दोन लाखांचे दागिने लंपास
Gold and silver prices fell, Lakshmi Pujan, Gold price,
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीचे दर घसरले; असे आहेत आजचे दर

..तर मात्र नियमानुसार कारवाई

बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. जे.के. माहेश्वरी यांनी श्वानप्रेमींना दिलासा दिला. श्वानप्रेमींना भटक्या श्वानांना रस्त्यावर खाऊ घालता येणार आहे. फक्त त्यांच्या या कृतीमुळे कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. पाळीव श्वानांची महापालिकेने नोंदणी करण्यास हरकत नाही. जर कुणी रस्त्यावर श्वानांना खाऊ घालताना अडथळा निर्माण करीत असेल तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.