गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभेचे खासदार अशोक नेते यांच्या वाहनाला ४ नोव्हेंबररोजी नागपूर-गडचिरोली महामार्गावर भरधाव टिप्परने धडक दिली. वेळीच ‘एअरबॅग’ उघडल्याने ते बचावले. मात्र, अपघातावेळच्या घडामोडीवरून हा घातपात असल्याचा संशय खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केल्याने खळबळ उडाली असून राजकीय वैमनस्यातून हा अपघात घडवून आणल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

खासदार अशोक नेते हे ३ नोव्हेंबरला मध्यरात्री मुंबईतून नागपूरला पोहोचले. नागपूर येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करून ४ नोव्हेंबरला सकाळी ते गडचिरोलीला जाण्यासाठी चारचाकी वाहनाने (एमएच ३३ एए- ९९९०) निघाले होते. विहिरीगावजवळ त्यांच्या वाहनासमोर अचानक टिप्पर आले व जोरदार धडक झाली. यावेळी खासदार नेते यांच्यासह चालक, दोन सुरक्षारक्षक व अन्य एक असे पाच जण वाहनात होते. नेते हे समोरील सीटवर होते. त्यांच्यासह चालकाची एअरबॅग उघडली, त्यामुळे त्या दोघांसह आतील इतर तीन प्रवाशी सुखरूप बचावले. मात्र, अपघातावेळी घडलेला प्रसंग शंका उपस्थित करणारा आहे. नेतेंचे वाहन महामार्गावरून जात असताना धडक दिलेला टीप्पर डाव्या बाजूला उभा होता. नेतेंचे वाहन जवळ येताच टीप्पर चालकाने महामार्गावर गाडी आडवी केली. यामुळे नेतेंच्या गाडीची टीप्परला थेट धडक बसली. सुदैवाने सीटबेल्ट लावून असल्याने वेळीच ‘एअरबॅग’ उघडले आणि नेतेंसह गाडीतील इतर सहकारी बचावले. अपघात एवढा भीषण होता की त्यांचे वाहन समोरून चक्काचूर झाले. या अपघातानंतर खासदार नेते यांनी पोलिसांकडे घातपाताची शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे हा अपघात होता की पुढे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणी राजकीय स्पर्धेतून घडवून आणला याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. नागपुरातील हुडकेश्वर पोलीस या अपघाताचा तपास करीत आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
India Alliance News
INDIA Alliance : इंडिया आघाडी महाराष्ट्रातील निकालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, भाजपाने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप कायम
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

हेही वाचा – चंद्रपूर : संतापजनक..! सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावली नाही; मुख्याध्यापिकेने २३ विद्यार्थिनींना…

हेही वाचा – नागपूर : बर्डी बाजारपेठेत दिवाळी खरेदीची तुफान गर्दी अन् दुकानाला आग

सकाळच्या सुमारास नागपूरहून गडचिरोलीकडे जात असताना महामार्गावर हा अपघात घडला. मात्र, अपघातावेळी डाव्या बाजूला उभा असलेला टीप्पर संशयास्पदरित्या आडवे आले. त्यामुळे पोलिसांना हा अपघात होता की घातपात या दिशेने तपास करण्याचे सांगितले आहे. लवकरच सत्य पुढे येईल. – अशोक नेते, खासदार, गडचिरोली</p>

Story img Loader