नागपूर : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हे हैदराबाद ही भारतातील सार्वजनिक आरोग्य, पोषण यावर संशोधन करणारी संस्था आहे. या संस्थेने प्रत्येक व्यक्तिच्या शरीराला किती प्रमाणात प्रथिनांची गरज आहे याचे प्रमाण ठरवून दिले आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे भारतीय पोल्ट्री विज्ञान संघटनेच्या वतीने तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजित रानडे यांनी प्रत्येक व्यक्तिला वर्षाला १८० अंडी आणि १२ किलो मांसाहार करणे आवश्यक असल्याचे वैज्ञानिक कारण सांगितले आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंडी, मांसाहार का आवश्यक?

करोना काळात अंड्यांची मागणी वाढली होती. शरीराला आजारातून बरे होण्यासाठी पोषण मिळणे गरज असल्याने कोव्हिड-१९मधून बरे होणाऱ्यांना अंड खाण्याचा सल्ला देण्यात आला होता. अंडे हा पोषक घटकांनी परिपूर्ण असलेला पदार्थ आहे. चांगल्या आरोग्यासाठी अंड्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण आवडीने अंडी खातात; पण तुम्हाला माहीत आहे का नियमित अंडी खाणे कितपत चांगले आहे? अंडी नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन आहे आणि आपल्या शरीरासाठी ती निरोगी आहेत असे डॉ. रानडे सांगतात.

हे ही वाचा…विधानसभा निवडणूक : अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दीर्घ रजेवर गंडांतर; अपरिहार्य कारणाशिवाय रजा घेतली तर…

रोज इतक्या प्रमाणात अंडी, मांस खाणे आवश्यक

अंडे किंवा मांसाहार हे निश्चितपणे एक पौष्टिक पदार्थ आहेत. त्याचे आरोग्याला अनेक चांगले फायदे होऊ शकतात. त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी-१२, सेलेनियम इत्यादी पोषक घटकांचा समावेश आहे. त्याशिवाय अंड्यांमध्ये चांगले फॅट्स आणि अंटीऑक्सिडंट्स घटक आहेत; जे मेंदू आणि डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. प्रत्येक माणसाला त्याच्या वजनाच्या तुलनेत प्रथिनांची गरज असते. जर एखाद्या व्यक्तीचे वजन हे ७० किलो असेल तर त्याला रोज ७० ग्रॅम प्रोटीने मिळणे आवश्यक आहे. ते मिळवण्यासाठी नैसर्गिक उत्पादने पुरेशी नाहीत. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून मी कमी प्रमाणात अंडी खाण्याचा सल्ला देईन. जर तुम्हाला कोणता आजार किंवा आरोग्याशी संबंधित समस्या असतील, तर अशा वेळी अंड्यांचे सेवन करण्याबाबत तुम्ही तुमच्या आहारतज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हे ही वाचा…“आम्ही कष्ट करून उदरनिर्वाह करायला तयार, पण समाज आम्हाला…” तृतीयपंथी शिवन्या, मोहिनीचा सवाल

कोंबडी, अंड्याविषयी अपप्रचार काय?

दुध, मांस आणि अंडी हे प्रमाण शरीराला पौष्टीक करण्यासाठी फार उपयुक्त आहे. मात्र, आपल्याकडे हल्ली बॉयलर किंवा अन्य कोंब‌ड्या या हायब्रीड किंवा इंजेक्शन देऊन तयार केल्या जातात असा अपप्रचार सुरू आहे. हे सर्व खोटे असून सर्व नैसिर्गिक पद्धतीने तयार होतात असेही रानडे यांनी सांगितले. कमी काळात अधिक उत्पादन देणाऱ्या या प्रजाती असून त्यांच्या वाढीसाठी कुठल्याही प्रकारच्या औषधांचा वापर होत नाही. त्यामुळे शरीरासाठी हे पौष्टीक असल्याचेही ते म्हणाले. हल्ली अन्य पदार्थांमधून आवश्यक त्या प्रमाणात प्रथिने मिळत नाही. त्यामुळे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या प्रमाणानुसार प्रत्येकाने वर्षाला १८० अंडी तर १२ किलो मांस खाणे आवश्यक आहे. इतरांच्या तुलनेत हे स्वस्त आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr ajit ranade stated that each person needs 180 eggs and 12 kg of meat annually dag 87 sud 02