चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. १७ जुलै रोजी अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या इन्फर्मेशन थेअरी अँड कोडिंग या सहाव्या सत्राच्या पेपरमध्ये परीक्षा विभागाकडून चक्क प्रश्नपत्रिकेतच उत्तर आल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यापीठ दरवर्षी परीक्षा घेत असून देखील अद्यापही परीक्षेचे योग्य व्यवस्थापन करता न येणे म्हणजे विद्यापीठाचे एकप्रकारे अपयश आहे. परीक्षासारख्या महत्त्वाच्या व्यवस्थापनेतील अनियोजनासाठी प्रशासकीय अधिकारी हे किती बेजबाबदार आणि अकार्यक्षम असल्याचे दिसून येते. अभाविप विदर्भ प्रदेश मंत्री शक्ती केराम म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या या विद्यापीठातील परीक्षांचा गोंधळ, विद्यार्थ्यांना होणारा नाहक त्रास, व्यवस्थापन शून्य परीक्षा यामुळे विद्यापीठाची बदनामी होत आहे. परीक्षा संचालकांची तात्काळ चौकशी करून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी.

हेही वाचा >>>गडचिरोली : ‘मायक्रोस्कोप’ चोरी प्रकरणात अधिकारी व कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात ? जिल्हा हिवताप कार्यालयातील घटना

तसेच विद्यापीठाचा हा अनागोंदी कारभार बंद करावा, अशी मागणी अभाविपने केली आहे.या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना सातत्याने मानसिक,आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठ प्रशानाकडे प्रश्नपत्रिकेत झालेल्या त्रुटीमध्ये जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तींची व परीक्षा संचालकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अन्यथा विद्यार्थ्यांच्या नुकसानीस जबाबदार असलेल्या विद्यापीठ प्रशासनास विद्यार्थ्यांच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr babasaheb ambedkar tantrashastra university examination department mismanagement rsj 74 amy
Show comments