उपराजधानीतील सुप्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम हे वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलाॅजीचे (डब्लू.एफ.एन.) विश्वस्त म्हणून निवडून आले आहे. जगातील १२३ देशातील मेंदूरोग तज्ज्ञ या फेडरेशनचे सदस्य आहेत. २५ ऑक्टोबरला ॲमस्टरडॅममध्ये बैठकीत या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. मेश्राम हे आता या फेडरेशनच्या तीन विश्वस्तांपैकी एक असतील. या पदाचा कार्यकाळ तीन वर्षे असेल. इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीचे सचिव आणि अध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर डॉ. मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पदार्पण केले. ते २०१७ पासून ‘डब्लूएफएन’च्या ‘ट्रॉपिकल न्यूरोलॉजी स्पेशॅलिटी ग्रुप’चे अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी ‘डब्लूएफएन’च्या संविधान आणि पोट कायदा समितीचे सदस्य म्हणून ६ वर्षे आणि वैज्ञानिक कार्यक्रम समितीचे सदस्य म्हणून ४ वर्ष काम केले आहे. बँकॉक, माराकेश, स्टॉकहोम, व्हिएन्ना, सॅंटियागो, क्योटो आणि दुबई येथे ‘डब्लूएफएन’च्या ‘कौन्सिल ऑफ डेलिगेट्स’च्या बैठकीसाठी त्यांनी सात वेळा राष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले. ते जर्नल ऑफ न्यूरोसायन्सेसच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजीवरील विशेष अंकाचे सहसंपादक आहेत.