लोकसत्ता टीम

वर्धा : वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ.इंद्रजीत खांडेकर यांची राज्य वैद्यकीय परिषदेवर तज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Eknath Shinde Help to Vinod Kambli
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून विनोद कांबळीला ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर, डॉक्टरांना दिल्या महत्त्वाच्या सूचना
loksatta readers feedback
लोकमानस: राज्यात आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्षच होणार?
Indian culture from the perspective of Sane Guruji
साने गुरुजींच्या दृष्टिकोनातून भारतीय संस्कृति
Tarun Bhati boating accident survivor doctors of St George Hospital
सेंट जॉर्जमधील डॉक्टरांनी घडवून आणली मायलेकरांची भेट, १४ वर्षांच्या तरुणचे वडील मात्र बेपत्ताच
Kharvi Samaj Samiti march , Guhagar Kharvi Samaj Samiti march, Kharvi Samaj in Guhagar,
रत्नागिरी : गुहागरात खारवी समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी खारवी समाज समितीचा विराट मोर्चा
Will Ajit Pawar go to the intellectual in Reshimbagh Nagpur news
रेशीमबागेतील बौद्धिकाला अजित पवार जाणार?

सेवाग्राम येथील महात्मा गांधी आर्युविज्ञान संस्थेत कार्यरत डॉ.खांडेकर हे वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणा करण्यात अग्रेसर म्हणून ओळखल्या जातात. राज्य वैद्यकीय परिषदेने महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या विरूद्ध दाखल झालेल्या वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणांची छाननी करण्यासाठी डॉ.खांडेकर यांची तज्ञ म्हणून निवड केली आहे. रूग्णाने डॉक्टरांच्या विरोधात थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे दाखल केलेल्या वैद्यकीय निष्काळजीपणांचा किंवा ग्राहक तसेच फौजदारी न्यायालयांनी कौन्सिलकडे तज्ञांच्या मतासाठी पाठवलेल्या वैद्यकीय प्रकरणांचा आढावा घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.

आणखी वाचा-गृहमंत्री पांघरून घालतात म्हणून गुन्हेगारी घटनांत वाढ, वडेट्टीवार यांचा आरोप

रूग्णावर उपचार करतांना डॉक्टरांकडून उपचाराबाबत अपेक्षीत निकषात वैद्यकीय उणीवा आहे अथवा नाही, हे तपासण्यासाठी कागदपत्रांचा अभ्यास करण्याचा सुद्धा त्यांना अधिकार असेल. उपचार करतांना डॉक्टरांकडून वैद्यकीय निष्काळजीपणा झाला की नाही यावर ते मत नोंदवितील. अलिकडच्या काळात डॉक्टरांवर निष्काळजीपणाचे आरोप सातत्याने होत आहे. न्याय मागण्यासाठी मग रूग्णाचे नातेवाईक डॉक्टरांच्या विरोधात राज्य वैद्यकीय परिषद, पोलीस ठाणे किंवा ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करू शकतात. ग्राहक न्यायालयात वैद्यकीय खर्च, वेदना व अन्य स्वरूपात नुकसानभरपाई मिळावी म्हणून अर्ज होतो. त्यासाठी घटनेच्या तारखेपासून दोन वर्षाच्या आत खटला दाखल केला जावू शकतो. उपचार करतांना चुकीचे निदान होणे, शस्त्रक्रियेतील चुका, औषधोपचारातील उणीवा, त्रूटीपूर्ण संमती, अपूरे उपचार किंवा त्याचा पाठपुरावा या स्वरूपात वैद्यकीय निष्काळजीपणा दिसून येण्याची उदाहरणे आहे. राज्य वैद्यकीय परिषदेचे प्रशासक डॉ.विकी रूघवानी यांनी डॉ.खांडेकर यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल डॉ.खांडेकर यांचे वैद्यकीय व सामाजिक वर्तुळात अभिनंदन होत आहे.

आणखी वाचा-बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…

डॉ. इंद्रजित खांडेकर हे वैद्यकीय क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यात अग्रेसर म्हणून वैद्यकीय क्षेत्रात ओळखल्या जातात. शासनदारीच नव्हे तर प्रसंगी उच्च व सर्वोच्च न्यायालयात त्यांनी आपली भूमिका पटवून देत आरोग्य व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यात मोलाची भूमिका पार पडली. डॉक्टरांचे हस्ताक्षर ही अशीच एक बाब आहे. रुग्णासाठी हे हस्ताक्षर रिडेबल असावे म्हणून त्यांनी लढा दिला. तडेच बलात्कार पीडितेस न्याय मिळावा म्हणून तक्रार अर्ज कसा असावा, याबाबत त्यांनी एक दीर्घ अहवाल शासनास दिला होता. त्यावर शासनाने सकारात्मक पाऊल उचलले होते. तसेच विविद बदल घडवून आणण्यात त्यांनी आजवर पुढाकार घेतला. त्यामुळे या नियुक्तीच्या माध्यमातून रुग्णांना योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षा सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होते.

Story img Loader