वर्धा : ज्यांच्या मागे मागे पदे स्वतः धावत असतात असा व्यक्ती म्हणजे डॉ. पी. जी. येवले, अशी चर्चा राज्याच्या शैक्षणिक वर्तुळत नेहमी होत असते. सलग ४० वर्ष डॉ. येवले हे प्रमुख पदावर कार्यरत राहले असून आता आणखी काही वर्षाची त्यात भर पडणार. नुकतीच त्यांची राजस्थान आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. सहसा आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूपदी वैद्यकीय शाखेतीलच व्यक्ती निवडल्या जात असतो. पण डॉ. येवले हे या संकेतात बसत नाही. कारण ते फार्मासिस्ट आहेत. म्हणजे औषधीनिर्माण शाश्र विषयाचे ते अभ्यासक व तज्ञ् म्हणून देशभर विख्यात आहेत. म्हणून आरोग्य विद्यापीठात कुलगुरू होण्याचा बहुमान प्राप्त करणारे ते देशातील पहिले फार्मसी प्राध्यापक ठरले आहे, तसे त्यांनी सोशल माध्यमात सूचित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९८५ साली ते वर्धेलगत बोरगावच्या फार्मसी कॉलेजचे प्राचार्य म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर त्यांनी वळून पाहलेच नाही. पुढे विद्यापीठाचे फार्मसी अधिष्ठाता. नंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू तर पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूपद त्यांनी भूषविले. या दरम्यान त्यांनी रामटेकचे संस्कृत, अमरावती विद्यापीठ, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ या ठिकाणी प्रभारी कुलगुरूपदाची काही महिने जबाबदारी सांभाळली होती. आता राजस्थानचे विद्यापीठ सहावे. कुलगुरू म्हणून पडलेल्या जबाबदारीचे. डॉ. येवले यांना मराठवाडा विद्यापीठाची जबाबदारी संपताच राज्य शासनाने राज्य गुणवत्ता नियंत्रण सेलचे संचालक नेमले होते. आता त्यातून बाहेर पडण्यास १५ दिवस लोटत नाही तोच राजस्थान.

महाराष्ट्रात कार्यरत डॉ. येवले थेट राजस्थान येथे कसे पोहचले ? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. तर त्यामागचे कारण म्हणजे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे होत.ते महाराष्ट्रात मंत्री असतांना डॉ. येवले यांच्याविषयी ऐकून होते. डॉ. येवले यांच्या प्रशासकीय नैपूण्य, कामाची हातोटी, निर्णयक्षमता याबद्दल त्यांना परिचय झाला होता. काही महिन्यापूर्वी त्यांनी डॉ. येवले यांच्याशी संवाद साधतांना राजस्थानच्या विद्यापीठात सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली होती. मात्र ते तिथेच बोलावून घेतील अशी सूतराम शक्यता नव्हती. अखेर फोन आला आणि डॉ. येवले परत कुलगुरू झाले. आरोग्य विद्यापीठात ज्या काही शाखा असतील, त्या शाखापैकी कोणत्याही शाखेचा तज्ञ कुलगुरू होवू शकतो. पण सहसा वैद्यकीय शाखेचा व्यक्ती निवडल्या जातो. म्हणून माझी नियुक्ती सर्व ते सोपस्कार व नियमास धरून झाल्याने आनंद वाटतो. हा अत्यंत अभिमान वाटावा असा क्षण. इथपर्यंत पोहचण्यास अनेकांच्या शुभेच्छा कामास आल्यात, अशी भावना कुलगुरू डॉ. येवले यांनी व्यक्त केली. २०२९ पर्यंत ही नियुक्ती राहणार.