सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. संदीप श्रीवास्तव यांची कन्या डॉ. प्रियल हिने डायदेमतर्फे आयोजित सौंदर्यवती स्पर्धेत ‘महाराष्ट्राची सौंदर्यवती ‘ हा किताब पटकावला. मुंबईत संपन्न स्पर्धेत अंतिम फेरीत ३० मुली निवडल्या गेल्या होत्या. त्यात डॉ. प्रियलने अव्वल स्थान पटकावले.
हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या
हेही वाचा : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य परीक्षक असलेल्या या स्पर्धेचे आयोजन डायदेम या बहुराष्ट्रीय कंपनीने केले होते. समर्पण, सेवाभाव व सचोटी या कसोटीवर मी माझे जीवन जगते, असे तिचे एका प्रश्नावरील उत्तर परीक्षकांना भावले. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आई-वडिलांनी प्रोत्साहन दिले की त्यांची इच्छा नव्हती, या प्रश्नावर प्रियलने स्पष्ट केले की, वडील डॉ. संदीप व आई डॉ. दीप्ती हेच माझे प्रेरणास्थान व सर्वकाही असून ते वेगळी वाट चोखाळण्याचा नेहमी सल्ला देतात.
हेही वाचा : १३ पेक्षा अधिक नागरिकांचा बळी घेणारा ‘टायगर’ अखेर जेरबंद
डॉ. प्रियल बाराव्या वर्गात जिल्ह्यात अव्वल राहिली असून एमबीबीएसला तिने पंधरा सुवर्णपदके प्राप्त केली होती. सध्या ती पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असून ‘मासिक सत्य’ हा मासिकपाळीच्या काळातील काळजीचा जनजागरणपर उपक्रम शालेय पातळीवर राबवित आहे.