बाजार समित्यांच्या धूमधडाक्यात झालेल्या निवडणुका सहकार नेतेपुत्रांना राजकीय वाटचालीचा मार्ग मोकळा करणारा ठरला आहे.आमदार,खासदार होण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नेतेपुत्र घोडदौड करीत असल्याचे चित्र असते. मात्र, बाजार समित्या आता नवे प्रवेशद्वार ठरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्येष्ठ सहकार नेते प्रा.सुरेश देशमुख यांचे चिरंजीव डॉ.संदीप देशमुख हे वर्धा बाजार समितीत सर्वाधिक मतांनी निवडून आले आहे. सूतगिरणीचेअध्यक्ष असलेले डॉ.संदीप यांचा पराभव करीत सहकार गटाचे नाक ठेच्ण्याचा चंग विरोधकांनी बांधला होता.पण तो फोल ठरवित विजयी झालेले डॉ.संदीप यांची बाजार समितीचे अध्यक्ष म्हणून निवड पक्की समजल्या जाते.

हेही वाचा >>>नागपूर : वादळी पावसामुळे विमानाच्या १ तास आकाशातच घिरट्या

देवळी बाजार समितीत विजयी झालेले मनीष खडसे व संजय कामनापुरे हे राजकीय परंपरा असलेल्या कुटुंबातून आले आहे. वजनदार गोडे कुटुंबातून पवन गोडे हे वर्धा बाजार समितीतून निवडून आले आहे. सेलू बाजार समितीत वरून दफ्तरी हे वारसदार विजयी झाले आहेत. ग्रामीण भागातील मतदारांनी राजकीय कुटुंबास कौल दिल्याचे हे चित्र आहे.