वर्धा : सावंगी येथील महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता तसेच पोटे आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य असलेले डॉ.भुतडा व त्यांचे सहकारी मेघे विद्यापिठातील अधिष्ठाता मनिष देशमुख यांना संयुक्तपणे केंद्र शासनाच्या बौध्दिक संपदा विभागाने वीस वर्षाच्या मुदतीसाठी हे पेटंट प्रमाणपत्र मालमत्ता प्रदान केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> चंद्रपूर: तीन बालकामगारांची सुटका; मालकाविरुद्ध गुन्हा

चिंता आणि तणाव दूर करण्यासाठी या दोघांनी ‘हर्बल रचना’ या सायरपचा आविष्कार केला. या सायरपच्या आणखी काही चाचणी होणार असल्याचे भुतडा म्हणाले.अस्वस्थता व तणाव घालविण्यासाठी उपलब्ध बहुतेक औषढीत निद्रा पोषक अशा प्रकारच्या वस्तू घटकांचा समावेश असतो, हे लक्षात ठेऊन सहज, सर्व वयोगटाला चालेल, ज्याची चव देखील पेय (सरबत) स्वरुपात राहील असे हे पेय असेल.तसेच  घटक द्रव्य देखील खाद्य व पेय वर्गात मान्य असलेली आहेत. हे पेय घेतल्यानंतर अगदी प्रसन्नता येऊन  ताण तणाव दूर ठेवण्यासाठी मदत मिळेल. यामुळे निद्रा येणार  नसल्याने केव्हाही कुठेही घेता येईल, असा दावा देशमुख व डॉ.भुतडा करतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr shyam bhutada and manish deshmukh get patent for herbal medicine pmd 64 zws