नेहमी येणारा ताप हा आजार नाही. मात्र आम्ही त्यासाठी औषधे घेऊन शरीराला पुन्हा आजारी करतो. करोनामधेही हेच झाले. तापच नाही तर कुठल्याही त्रासावर औषध घेऊन आम्ही स्वतःचे आयुष्य कमी करत चाललेलो आहोत. औषधे न घेता करोना, ताप, मधुमेह व अनेक आजार आम्ही बरे करू शकतो, असा दावा डॉ. विश्वरूप रॉय चौधरी यांनी केला. करोना हा विनाऔषधाने बरा होणार साधा सर्दी, ताप खोकला असल्याचेही ते म्हणाले. ‘क्युअर ॲट होम’ या विषयावर रविवारी वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
गुरुत्वाकर्षण शक्ती, शरीरातील ऊर्जा आणि अन्न हे एक औषध म्हणून काम करते. मात्र याची आपल्याला माहिती नाही. आपण औषधाच्या मागे लागतो. उदाहरण द्यायचे झाल्यास मधुमेहाचे देता येईल. मधुमेहाचे औषध घेतल्याने केवळ तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. मात्र ती शरीराच्या बाहेर निघत नसून शरीरातील एका अवयवामध्ये राहते. परिणामी तो अवयव हळूहळू कमजोर होऊ लागतो. कुठलेही औषध तुमच्या शरीरातून आजार बाहेर काढत नाही तर शरीराला रोगी करण्याचे काम करते. त्यामुळे आपल्याच शरीराला आपणच कसे निरोगी करू शकतो हे शिकणे आवश्यक आहे, असे डॉ. विश्वरूप रॉय चौधरी म्हणाले.
मधुमेह, उच्च रक्तदाब हे केवळ आकड्यांचा खेळ आहे. त्यामुळे औषधे घेऊन आम्ही मृत्यचे प्रमाण वाढवत असल्याने स्वतःचे डॉक्टर स्वतः बना असा सल्लाही डॉ. रॉय चौधरी यांनी दिला. यावेळी त्यांनी अनेक उदाहरणे देऊन विविध आजारापासून कसे बरे होता येईल, याची माहिती दिली.