लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा : लोकार्पण झाल्यापासून हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वाहन अपघातामुळे सतत गाजत आहे. या अपघातांचे मुख्य कारण चालकाला लागणारी डुलकी आहे. मागील चार दिवसात समृद्धी महामार्गावर झालेले तीन अपघात याच कारणाने झाले आहे.

आज रविवारी सकाळी झालेला अपघात यामुळेच झाला आहे. समृद्धी महामार्गावर नागपूर कॅरीडोअर वरील चॅनेल क्र मांक २९५.२ मेहकर पोलीस ठाणे हद्दीत आयशर व ट्रक अपघातात एक चालक जागीच ठार झाला आहे. आज १९ जानेवारी सकाळी दरम्यान पालघर येथून नागपूरच्या दिशेने जात असलेले आयशर क्रमांकच्या चालकाला ‌डुलकी लागली. या आयशर चालकाने झोपेच्या तंद्रीत समोरील ट्रक क्रमांक सीजी-०४-एम एफ-६२४३ ला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये आयशर चालक अमित कुमार यादव हा जागेवरच स्टेअरिंगमध्ये अडकून मरण पावला.

आणखी वाचा-दाभाडीमध्ये धाडसी दरोडा, झटापटीत महिला ठार

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीसचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप इंगळे,उप निरीक्षक गजानन उज्जैनकर, पोलीस हवालदार गोविंद उबरहंडे, मुकेश जाधव, अमोल हरमकर यांनी तात्काळ घटना स्थळ गाठले. यानंतर आयशरमधील चालकाच्या मृतदेहास समृद्धी महामार्गावरील मेहकर येथील जलद कृती दलाचे अजय पाटील, शैलेश मोरे ,पंकज तायडे, यांनी कटरच्या साह्याने पत्रा कापून बाहेर काढले. तात्काळ समृद्धी महामार्ग ॲम्बुलन्स चे डॉक्टर स्वप्नील सुसर यांनी तपासणी केल्यावर त्याला मृत घोषित केले. मृतदेह मेहकर येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आला. दोन्ही अपघातग्रस्त दोन्ही वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहे.

काल झोपेच्या डुलकीत झालेल्या अपघातात एक ठार दोन जखमी झाले होते .परवा झालेल्या अपघातात कार चालकाला डुलकी लागल्याने भीषण अपघात झाला होता. मात्र सीट बेल्ट व एअरबॅगमुळे चौघे बचावले होते

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Driver killed in horrific collision between truck and eicher on samruddhi highway scm 61 mrj