नागपूर :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सध्या तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचा हा पहिला महाराष्ट्र दौरा आहे. त्यांच्या या दौऱ्याबाबत कमालीची उत्सूकता असून त्यांच्याबाबत अनेक बाबी जाणून घेण्यास लोक इच्छुक आहेत. ओडिशा राज्यात जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू यांचे मूळ नाव वेगळे आहे. त्याविषयी जाणून घेऊया. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी रायरंगपूर, ओडिशाच्या बैदापोसी भागातील उपरबेडा गावात झाला. त्यांचे वडील बिरांची नारायण तुडू हे शेतकरी होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे नाव पुती तुडू ठेवले. प्राथमिक शाळेतील शिक्षिकेने त्यांचे द्रौपदी असे ठेवले. तर विवाहानंतर त्यांचे आडनाव मुर्मू असे झाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मूळ नाव माहित आहे काय ?
प्राथमिक शाळेतील शिक्षिकेने त्यांचे द्रौपदी असे ठेवले. तर विवाहानंतर त्यांचे आडनाव मुर्मू असे झाले.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 05-07-2023 at 21:24 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Droupadi murmu on vidarbha visit original name of president droupadi murmu rbt 74 zws