नागपूर :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सध्या तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर  त्यांचा हा पहिला महाराष्ट्र दौरा आहे. त्यांच्या या दौऱ्याबाबत कमालीची उत्सूकता असून त्यांच्याबाबत अनेक बाबी जाणून घेण्यास लोक इच्छुक आहेत. ओडिशा राज्यात जन्मलेल्या  द्रौपदी मुर्मू यांचे मूळ नाव वेगळे आहे. त्याविषयी जाणून घेऊया. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी रायरंगपूर, ओडिशाच्या बैदापोसी भागातील उपरबेडा गावात झाला. त्यांचे वडील बिरांची नारायण तुडू हे शेतकरी होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे नाव पुती तुडू ठेवले. प्राथमिक शाळेतील शिक्षिकेने त्यांचे द्रौपदी असे ठेवले. तर विवाहानंतर त्यांचे आडनाव मुर्मू असे झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा