गेल्या काही महिन्यांपासून मध्यवर्ती कारागृहात गांजा, मोबाईल, बॅटरी आणि सीमकार्ड सापडत असल्यामुळे कारागृह राज्यभर चर्चेत आले आहे. त्यात विदर्भातीस सर्वात मोठा ड्रग्स तस्कर आबू खानला एका कुख्यात कैद्याने मारहाण केल्यामुळे पुन्हा नागपूर कारागृह चर्चेत आले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या सलगीमुळे काही कर्मचाऱ्यांनी मध्यवर्ती कारागृहात गांजा आणि मोबाईल पुरवण्याचे रॅकेट उघडले होते. निलंबित पोलीस उपनिरीक्षक प्रदीप नितवणे आणि खापरखेड्यातील मोक्काचा आरोपी सूरज कावळे यांनी कारागृहातील काही महाभागांंना हाताशी धरून गांजा आणि मोबाईल पुरवणारे रॅकेट सुरू केले होते. मात्र, सूरज आणि प्रदीपला दोघांचे भाऊ शुभम कावळे आणि तहसील पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सचिन नितवणे हे दोघे गांजा आणि मोबाईल पुरवत होते. हे दोघेही आरोपी सेलमधील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच कारागृहातील कर्मचाऱ्यांना ‘सेट’ करीत होते. हे रॅकेट उघडकीस आल्याने राज्यभरात पडसात उमटले होते. याच प्रकरणात वादग्रस्त उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची बदली झाली होती.

हेही वाचा >>> यवतमाळ : काळरुपी पुरातून ९० वर्षीय महिलेसह आठ रुग्णांची सुखरूप सुटका ; बचाव पथक ठरले देवदूत

ताजबागमधील प्यारे नावाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पांढरपेशासोबत वाद झाल्यानंतर कुख्यात ड्रग्स तस्कर आबू खानला फरार होता. त्याला सक्करदरा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. तो गेल्या तीन-चार महिन्यापासून नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. तसेच एका हत्याकांडात वसंतनगर झोपडपट्टीतील गुंड भुरू खानही कारागृहात आहे. सोमवारी हे दोन्ही कैदी एकमेकांसमोर आले होते. दोघांमध्ये शिवीगाळ झाली. आबू खानाला भूरूने मारहाण केली. त्यानंतर कारागृहातील कर्मचाऱ्यांनी दोघांना सोडवले. या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नसून कारागृह अधीक्षक अनुप कुमरे यांनी बाचाबाची झाल्याची माहिती माध्यमांना दिली. कारागृहातून पुणे दक्षता पथकाने मोबाईल जप्त केला होता, तर नागपूर पोलिसांनी गांजा जप्त केल्यानंतर कारागृह प्रशासनाच्या मदतीने कारागृहात मोबाईल, गांजा पुरवण्यात येत असल्याची चर्चा होती.

Story img Loader