गेल्या काही महिन्यांपासून मध्यवर्ती कारागृहात गांजा, मोबाईल, बॅटरी आणि सीमकार्ड सापडत असल्यामुळे कारागृह राज्यभर चर्चेत आले आहे. त्यात विदर्भातीस सर्वात मोठा ड्रग्स तस्कर आबू खानला एका कुख्यात कैद्याने मारहाण केल्यामुळे पुन्हा नागपूर कारागृह चर्चेत आले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या सलगीमुळे काही कर्मचाऱ्यांनी मध्यवर्ती कारागृहात गांजा आणि मोबाईल पुरवण्याचे रॅकेट उघडले होते. निलंबित पोलीस उपनिरीक्षक प्रदीप नितवणे आणि खापरखेड्यातील मोक्काचा आरोपी सूरज कावळे यांनी कारागृहातील काही महाभागांंना हाताशी धरून गांजा आणि मोबाईल पुरवणारे रॅकेट सुरू केले होते. मात्र, सूरज आणि प्रदीपला दोघांचे भाऊ शुभम कावळे आणि तहसील पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सचिन नितवणे हे दोघे गांजा आणि मोबाईल पुरवत होते. हे दोघेही आरोपी सेलमधील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच कारागृहातील कर्मचाऱ्यांना ‘सेट’ करीत होते. हे रॅकेट उघडकीस आल्याने राज्यभरात पडसात उमटले होते. याच प्रकरणात वादग्रस्त उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची बदली झाली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा