नागपूर : नागपूरमध्ये परदेशातून विमानाव्दारे अमलीपदार्थाची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे. यावरून तस्कारांनी आता मोठ्या शहरासोबतच नागपूरसारख्या तुलनेने लहान शहरातही त्यांचे पाळेमुळे पसरवायला सुरुवात केल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, यात आंतरराष्ट्रीय तस्कर सहभागी असल्याची बाबदेखील समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शुक्रवारी एका भारतीय युवकाला अटक केली व त्याच्याकडून ३.०७ किलोग्राम अमलीपदार्थ जप्त केले होते. हा युवक नैरोबी, केनिया येथून शारजाह, यूएई मार्गे नागपुरात आला होता. जप्त केलेल्या अमली पदार्थाचे बाजारमूल्य २४ कोटी रुपये आहे. या प्रकरणी पश्चिम दिल्लीच्या सुभाष नगर परिसरातून एका नायजेरियन नागरिकालाही सोमवारी अटक करण्यात आली.

हेही वाचा – बुलढाणा: बस व दुचाकीची धडक; एक ठार, दोघे गंभीर

हेही वाचा – भाजपामधून काँग्रेसमध्ये आलेला आमदार अडकणार? सना खान हत्याकांडात आणखी दोघांना अटक

नागपूर सारख्या तुलनेने छोट्या विमानतळाचा वापर अमलीपदार्थाच्या तस्करीसाठी करणे व त्यासाठी नवीन ठिकाणे आणि कार्यपद्धती अवलंबणे तस्करांनी सुरू केल्याचे वरील घटनेवरून दिसून येत.