एसटी बसचा चालक मद्यप्राशन करून अतिवेगात बस चालवत असल्याने प्रवासी घाबरून वेग कमी ठेवण्याची विनंती केली. मात्र चालकाने कुणाचेही ऐकले नाही. एका दाम्पत्याने चालकाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालक त्यांच्याशी भांडू लागला. बसमधील एक विद्यार्थी चालकाचा ‘व्हिडीओ’ काढत होता. हे लक्षात येतात चालकाने थेट विद्यार्थ्याकडे धाव घेतली आणि त्याला मारहाण केली. हा प्रकार गोंडपिपरी धाबा मार्गावरील गोजोली येथे घडला. गोंडपिपरी तालुका त्यात येणाऱ्या धाबा परिसरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी तालुक्याच स्थळ गाठतात. विद्यार्थी एसटी बसने प्रवास करतात.
हेही वाचा >>> नागपूर : काय हे? श्वानाशी अनैसर्गिक कृत्य? प्रकरण पाहोचले पोलीस ठाण्यात; सामाजिक कार्यकर्त्याकडून श्वानावर उपचार
आज शाळा सुटल्यावर घरी परत येण्यासाठी विद्यार्थ्यांनी एमएच १४ बीटी १६७५ क्रमांकाची गोंडपिपरी राजुरा बस पकडली. गोंडपिपरी धाबा मार्गाचे बांधकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी मार्ग खोदलेल्या अवस्थेत आहे तर मार्गात हजारो खड्डे आहेत. अशा मार्गावरून बसचालक वेगाने गाडी चालवू लागला. याच्या त्रास प्रवाशांना झाला. प्रवाशांनी गाडी हळू चालवण्याची विनंती केली. मात्र चालक ऐकायला तयार नव्हता. गोजिरी गावात बस थांबताच धाबा गावातील विलास सिडाम, त्यांची पत्नी रेखा यांनी चालकाला परत विनंती केली. मात्र चालकाने त्यांच्याशी भांडण सुरू केले. त्यांचे हे भांडण गाडीत बसलेला धनराज कुकुडकर नावाचा विद्यार्थी मोबाईलमध्ये ‘रेकॉर्ड’ करत होता.
चालकाच्या लक्षात येतात चालकाने त्याच्यावर धाव घेतली. त्याला मारहाण केली. बस धाबा बसस्थानकावर थांबली. बसस्थानकाला लागूनच पोलीस ठाणे आहे. सिडाम आणि विद्यार्थी पोलीस ठाण्याकडे जायला निघालेत. त्याचवेळी चालक गाडी घेऊन पुढे गेला. या प्रकाराने विद्यार्थी पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, चालकावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.