यवतमाळ : नशेत माणूस काय करेल सांगता येत नाही. नशेत तो काहीही धाडस करू शकतो. पण जेव्हा नशा उतरते तेव्हा आपण काय करून बसलो हे दिसते तेव्हा पायाखालची वाळू सरकते. असाच अनुभव यवतमाळमध्ये गुरूवारी अनेकांना आला.
यवतमाळचा पारा सध्या ४४ अंशावर पोचला आहे. मोहनने मद्यपान केल्यावर त्याला थंड हवेची गरज वाटू लागली. या गरजेपोटी तो थेट बीएसएनएल टॉवरवर चढला व झोपला. दुपारी नशा उतरल्यावर त्याला आपण कुठे आहो याचे भान आले आणि त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. दुपारचे तळपते ऊन पाहून त्याला काहीच सूचत नव्हते. तळपत्या उन्हात त्याला डिहायड्रेशन झाले. त्याने पिण्यासाठी पाणी मागितले पण ते द्यायलही तेथे कोणी नव्हते.
हेही वाचा…बाजार उघडताच सोन्याचे दर निच्चांकी पातळीवर, हे आहेत आजचे दर…
त्याच्या शरीरात त्राण नव्हते. त्याने आरडाओरड सुरू केली. मोहनला खाली उतरवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला. अग्निशमन पथक, पथक, पोलीस पथक घटनास्थळी पोचले. उन्हामुळे तापलेल्या टॉवेरवर चढणार कोण असा प्रश्न निर्माण झाला . कोणीच पुढे येत नव्हते. अखेर परिसरातील तरुणांनी पुढाकार घेतला, तेव्हा पथकातील कर्मचारी मदतीला आले.मोहनला एका युवकाने खांद्यावर बसवून टॉवरवरून खाली आणले.
यवतमाळातील मेडिकल कॉलेज चौकात वावरणारा मोहन दारव्हा मार्गावरील बीएसएनएलच्या टॉवरवर चढला. दारूच्या नशेत त्याला तिथेच झोप लागली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्याने आरडाओरड सुरू केली. यानंतर टॉवरवर मोहन चढल्याचे लक्षात आले. मोहनला खाली उतरविण्यासाठी अग्निशमन विभागाची यंत्रणा पोहोचली.
हेही वाचा…राज्याचा नवा शालेय अभ्यासक्रम खटकतोय ? ‘या’ मुदतीत नोंदवा आक्षेप…
त्यांनी लाऊडस्पीकरवर त्याला वारंवार सूचना दिल्या. मात्र, त्याची प्रकृती उन्हाने गंभीर झाली होती. उतरणे सहज शक्य नव्हते. त्यामुळे परिसरातील तरुण टॉवरवर चढले. त्याला खांद्यावर घेऊन खाली आणले. त्यानंतर तत्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. युवकाने धाडस दाखविल्याने मोहनचा जीव वाचविण्यात यश आले.
हेही वाचा…छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान; शस्त्रे जप्त
मोहन खाली आल्यावर प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला. यवतमाळमध्ये बीएसएनएल च्या या टॉवरवर अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे हे टॉवर धोक्याचे ठरत असून, या ठिकाणी पूर्णवेळ सुरक्षा रक्षक असणे गरजेचे झाले आहे.