गडचिरोली : गेल्या तीन वर्षांपासून छत्तीसगड, गडचिरोली पोलिसांनी केलेल्या आक्रमक कारवायांमुळे नक्षलवाद्यांची कोंडी झाली असून ते सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात पुन्हा तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील बालाघाट जंगलात बस्थान मांडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यामुळेच या भागात दशकभरापासून शांत असलेले नक्षली पुन्हा एकदा सक्रिय झाले असून राज्यासह केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने नक्षल्यांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे.

सत्तरच्या दशकात पश्चिम बंगालमधून फोफावलेल्या हिंसक नक्षलवादी चळवळीने १९८० सुमारास तेलंगणातून(तत्कालीन आंध्र प्रदेश) मिळालेल्या प्रतीसादामुळे दंडकारण्यातील सात राज्यात आपली पाळेमुळे रोवली. त्यावेळी तेलंगणातील एक सुशिक्षित तरुण, तरुणींचा गट या चळवळीत सामील झाला होता. म्हणून प्रभावित क्षेत्रातून त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. मात्र, त्यादरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे तत्कालीन केंद्र व आंध्रप्रदेश सरकारने नक्षलवाद्यांविरोधात ‘ग्रीन हंट’ अभियान राबवून यावर अंकुश मिळविले. यात पोलीस जवानांच्या ‘ग्रेहॉऊंड्स’ या विशेष नक्षलविरोधी पथकाने मोठी भूमिका बजावली. यादरम्यान, नक्षल नेत्यांनी गडचिरोली आणि छत्तीसगडमधील आदिवासीबहुल भागावर लक्ष केंद्रित करून समांतर शासन चालविण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र, २०१० नंतर तत्कालीन केंद्र सरकारने नक्षलवाद्यांच्याविरोधात कडक भूमिका घेत नक्षलविरोधी धोरण प्रभावीपणे लागू केले. त्यानंतर या भागात अनेक चकमकी झाल्या. त्यामुळे नक्षल चळवळीचा मेंदू समजल्या जाणाऱ्या तेलंगणात ही चळवळ जवळपास संपुष्टात आली होती. अनेक नक्षल नेते गडचिरोली आणि अबुझमाड परिसरात पळून गेले तर काही भूमिगत झाले. २०२० पासून केंद्र सरकारने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे नक्षल चळवळीचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अबुझमाडवर सुरक्षा यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले आहे. मागील वर्षभरात छत्तीसगड, गडचिरोलीत झालेल्या चकमकीत नक्षल्यांच्या मोठ्या नेत्यांसह जवानांनी ३५० हून अधिक नक्षलवाद्यांना ठार केले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या नक्षल नेत्यांनी निवाऱ्यासाठी सुरक्षित स्थळ शोधणे सुरु केले आहे. याच प्रयत्नात असताना गेल्या दोन महिन्यात विविध चकमकीत तेलंगणात १२ नक्षल्यांना ठार करण्यात आले. तर मध्यप्रदेशातील बालाघाट परिसरातदेखील दोन नक्षल नेत्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यामुळे तेलंगणात दशकभरापासून शांत असलेली नक्षल चळवळ पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.

temperature drops in vidarbha region
थंडीचा कहर, उपराजधानी गारठली; किमान तापमानात वेगाने घसरण
union minister pratap rao jadhav meet cm devendra fadnavis in buldhana
प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्र्याना दिला हा प्रस्ताव, फडणवीस…
crime increased in Nagpur
लोकजागर : पोलीस करतात काय?
Maharashtra Sadan not available for Sahitya Sammelan Delay for four months on fee issue Nagpur news
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मिळेना! शुल्काच्या मुद्द्यावर चार महिन्यांपासून खल
HMPV Nagpur , HMPV suspects Nagpur,
नागपुरातील ‘एचएमपीव्ही’ संशयितांची तपासणी लांबणीवर, एम्स रुग्णालय…
accused ran away, Jaripatka police, Nagpur ,
नागपूर पोलिसांवर नामुष्की, पळून गेलेला आरोपी गेला कुठे?
Father murder by psychopath, Risod Taluka,
अकोला : मनोरुग्णाकडून वडिलांची हत्या, घरातच केले डोक्यावर वार
Suresh Dhas , Walmik Karad, Amol Mitkari allegation ,
अकोला : सुरेश धस वाल्मीक कराडच्या संपर्कात होते, मिटकरींच्या आरोपाने खळबळ
Chikhla village missing kid, missing kid neel forest,
भंडारा : ‘नील’ला नेणारा तो ‘हरा मामा’ कोण ? चार दिवसांनंतर रहस्य…

हेही वाचा…महाराष्ट्र तेलंगणा सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के

चळवळीची सूत्रे तेलंगणातील नेत्यांकडे

हिंसक नक्षलवादी चळवळीचा मेंदू म्हणून तेलंगणातील काही नेत्यांकडे बघितल्या जाते. यात नक्षलवाद्यांच्या ‘पीडब्लूजी’चे (पीपल्स वॉर ग्रुप) संस्थापक कोंडापल्ली सीतारामय्या, लक्ष्मण राव, केशव राव, कटकम सुदर्शन, कोटेश्वर राव, नर्मदाअक्का यांची नावे अग्रणी आहे. हे नेते हयात नसले तरी यांच्यानंतर चळवळीत आलेले अनेक जण आज मोठी भूमिका बजावत आहेत. त्यामुळे तेलंगणा पुन्हा एकदा नक्षल्यांच्या केंद्र स्थानावर आले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवण्यात आम्हाला मोठ्या प्रमाणात यश आले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी कोलामार्का जंगल परिसरात झालेल्या चकमकीत तेलंगणातील चार जहाल नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. तेव्हापासून छत्तीसगड जाण्यासाठी गडचिरोलीचा मार्ग बंद झाला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच कोणत्याही हिंसक घटनेविना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी पार पडल्या. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली

Story img Loader