लोकसत्ता टीम
नागपूर: नागपूरहून पुण्यासाठी निघालेल्या विमानाला पक्षी धडकला. परंतु वैमानिकाने तातडीने विमान उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर हे विमान रद्द करण्यात आले आणि प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली.
सोमवारी अडीजच्या सुमारास इंडिगोच्या विमानाने पुण्यासाठी उड्डाण घेताच एका पक्षाने विमानाला धडक दिली. ही बाब वैमानिकाच्या लक्षात येताच त्याने लगेच विमान परत नेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तासाभराने या विमानातील प्रवाशांची दुसऱ्या विमानाने जाण्याची व्यवस्था करण्यात आली. नागपूर – पुणे इंडिगो विमान क्रमांक ६३१३५ ने नियोजितवेळी उड्डान घेताच त्याला पक्षाने धडक दिली.
हेही वाचा… आता शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबिद रुही यांनी मात्र अशी कुठली घटना घडली नसल्याचे सांगितले.