बुलढाणा: घरगुती वादामुळे वेगळ्या राहणाऱ्या पत्नीला कायमचं संपवायचे त्याने ठरविले. मात्र त्यासाठी निष्ठुर आणि विकृत बुद्धीच्या नवऱ्याने वेगळाच ‘फंडा’ वापरला.आपल्या भरधाव कार ने त्याने दुचाकीवरून जाणाऱ्या पत्नी आणि शालक (साळा) याना जाणीवपूर्वक धडक दिली…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यात पत्नीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला तर साळा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णलयात उपचार सुरू आहे. नराधम पतीने विभक्त राहणाऱ्या पत्नीला कौटुंबिक वादातून कायमचे संपविण्याच्या या घटनेने चिखली शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.समाधान सुरडकर असे या विकृत बुद्धीच्या नवऱ्याचे नाव असून तो चिखली तालुक्यातील बेराळा येथील राहणारा आहे. सविता समाधान सुरडकर( रा. बेराळा, हमु आळंदी,पुणे) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

हे ही वाचा…नवरात्राच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण.. हे आहे आजचे दर…

चिखली पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पती समाधान सुरडकर आणि पत्नी सविता सुरडकर दोघे सध्या वेगवेगळे राहत होते. त्यांचे प्रकरण चिखली न्यायालयात सुरू आहे. ३० सप्टेंबर रोजी न्यायालयाची तारीख असल्याने सविता ‘कोर्टात’ तारखेवर हजर राहिली. तेथील काम झाल्यावर चिखली शहरातील मंडई मध्ये ती भाजीपाला खरेदी करत होती. त्यावेळी संतोष इंगळे नामक इसम आणि त्याच्या पत्नीने सविता सोबत वाद घातला. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी सविताने चिखली पोलीस ठाणे गाठले. दरम्यान या घटनेची माहिती तिने( सविताने )मावस भाऊ केशव भानुदास महाले यांना फोन करून दिली. यावर केशव महाले लगेच पोलीस ठाण्या मध्ये पोहचले. त्यांनी मध्यस्थी करून तक्रार द्यायची नाही असे ठरवले.

दुचाकी बाजूला घेतल्यावरही…

या प्रकारानंतर केशव महाले हे मावस बहीण सविता हिला मोटारसायकल वर बसवून घराकडे निघाले. यावेळी नवरा समाधान सुरडकर हा भरधाव वेगाने बलेनो कारने पाठीमागुन येत असल्याचे सविताने पाहिले. गाडी डाव्या बाजूने सुरक्षित घे असे सविताने मावस भाऊ केशव यांना सांगितले. गाडी डाव्या बाजूने सुरक्षित असताना देखील समाधान सुरडकर याने केशव महाले यांच्या दुचाकीला वेगात धडक दिली. या धडकेत सविता व केशव दोघे गंभीर झाले. या घटनेनंतर धडक मारणारा सविताचा नवरा, बायको रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना देखील तिथून फरार झाला.

हे ही वाचा…पोहरादेवीचे ‘बंजारा विरासत ‘ संग्रहालय कसे आहे? पंतप्रधानांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण

संभाजीनगरात अंत दरम्यान दोघा जखमींना चिखली येथील जवंजाळ रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ भरती करण्यात आले. प्रकृती जास्तच गंभीर असल्याने सविताला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. सविताने अनेक तास मृत्यूशी झुंज दिली. मात्र अखेर ती अपयशी ठरली. काल रात्री उशिरा सविताची प्राण ज्योत मालविली. याप्रकरणी सविताचा मावस भाऊ केशव महाले यांच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी आधी खुनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता काल रात्री उशिरा त्यात खुनाचे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. घटनेनंतर फरार झालेल्या क्रूरकर्मा पतीचा चिखली पोलिसांचे पथक कसोशीने शोध घेत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to family dispute husband deliberately hit his wife and brother in law with his speeding car scm 61 sud 02