गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात सोमवारी मध्य रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी दुसर्या दिवशी कायम असून जिल्ह्य़ात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील ८ ही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.गोंदिया येथे पावसामुळे घर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर देवरी तालुक्यातील बाघ नदी पात्रात शिरपूर मध्ये अडकलेल्या दोन जण सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याचप्रमाणे शिरपूरबांध येथील गंगा देशलाहरे (५३) , हरी देशलाहरे (४५) दोघे रा. खैरागड ( छत्तीसगड) , अनिल सुरजभान बागडे रा. शिरपूरबांध ता. देवरी या तिघांना बाहेर काढण्यात आले तर शिरपूर बांध जवळील रस्ता ओलांडताना पेट्रोलचा टॅंकर वाहून गेला. गोंदिया शहारासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचले. घरात पाणी शिरले, साहित्यांची प्रचंड नासाडी झाली. गोरेगाव येथे सुध्दा घऱामध्ये पाणी शिरले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा